ने.हि.महाविद्यालयातील फराह खान पठाण ला दोन सुवर्णपदक.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : येथील नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयातील पदव्युत्तर मराठी विभागातील सत्र २०२४-२५ मधिल विद्यार्थिनी कु. फराहनाज जब्बारखान पठाणला नुकत्याच झालेल्या गोंडवाना विद्यापीठाच्या १३ दीक्षांत समारंभात सर्वप्रथम आल्याबद्दल दोन सुवर्णपदक मान्यवरांच्या हस्ते बहाल करण्यात आली.कुलगुरु डॉ प्रशांत बोकारे,प्र - कुलगुरू डॉ श्रीराम कावळे,कुलसचिव डॉ अनिल हिरेखान यांनी फराहनाजला दोन सुवर्णपदक देऊन सन्मानित केले.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्रीमती स्नेहलताताई भैया, उपाध्यक्ष अँड प्रकाश भैया,सचिव अशोक भैया, ज्येष्ठ सदस्य प्रा जी एन केला,गौरव भैया,प्राचार्य डॉ.सुभाष शेकोकर,विभागप्रमुख डॉ.धनराज खानोरकर,डॉ.प्रकाश वट्टी,डॉ पद्माकर वानखडे व इतर सर्व कर्मचारी वर्गाने तिचे हार्दिक अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

