गोंडवाना विद्यापीठ परिसरात अल्पवयीन मुलांना तंबाखूजन्य पदार्थांची विक्री. 📍कोटगल येथील चार पानठेला चालकांवर गुन्हा दाखल करून तंबाखूजन्य पदार्थ जप्त.

गोंडवाना विद्यापीठ परिसरात अल्पवयीन मुलांना तंबाखूजन्य पदार्थांची विक्री.


📍कोटगल येथील चार पानठेला चालकांवर गुन्हा दाखल करून तंबाखूजन्य पदार्थ जप्त.


एस.के.24 तास


गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठ परिसरात अल्पवयीन मुलांना तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत असल्याची बाब समोर आल्यानंतर गडचिरोली पोलिसांनी मंगळवारी धडक कारवाई केली. या कारवाईत चार पानठेला चालकांवर गुन्हा दाखल करून तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.


विद्यापीठ परिसरासह आजूबाजूच्या भागात 18 वर्षांखालील मुलांना गुटखा, खर्रा व अन्य तंबाखूजन्य पदार्थ खुलेआम विकले जात असल्याच्या तक्रारी पोलिसांना प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण,पोलिस उपनिरीक्षक भास्कर ठाकरे  व त्यांच्या पथकाने २० जानेवारी रोजी परिसरात गस्त व तपासणी मोहीम राबवली.


दुपारी 3.30 वा.च्या सुमारास कोटगल चौक, युनिव्हर्सिटी रोड परिसरातील पानठेल्यांवर तपासणी करण्यात आली. या तपासणीदरम्यान चार पानठेला चालक अल्पवयीन मुलांना तंबाखूजन्य खर्रा विक्री करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी दोन पंचांच्या उपस्थितीत चारही पानठेल्यांची झडती घेतली असता प्रत्येकी 40 रुपये किमतीचा एक खर्रा जप्त करण्यात आला.


या प्रकरणी पानठेला चालक श्रीनिवास रजित पाल वय,23 वर्ष,सुधाकर कसुदेव दुधबाठी वय,51 वर्ष, मुखरु कवटू रेगडवार वय,44 वर्ष आणि नीलेश उमाजी दहागावकर वय,34 वर्ष सर्व राहणार कोटगल,यांच्याविरुद्ध सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने अधिनियम २००३ मधील कलम ६ व २४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


शैक्षणिक परिसरात व अल्पवयीन मुलांना तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर यापुढेही कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा गडचिरोली पोलिसांनी दिला आहे. या कारवाईमुळे अल्पवयीनांना खर्रा विकणाऱ्या पानठेला चालकांना चांगलाच दणका बसला असून, परिसरात खळबळ उडाली आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !