डॉ.आंबेडकर महाविद्यालयात वार्षिक क्रीडामहोत्सवाचे उद्घाटन संपन्न.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अॅण्ड सायन्स, ब्रम्हपुरी येथे वार्षिकोत्सव- २०२६ अंतर्गत क्रीडामहोत्सवाचे उद्घाटन नुकतेच संपन्न झाले.
या क्रीडामहोत्सवाचे उद्घाटन डॉ. बाबासाहेब आंबेडकर एज्युकेशन सोसायटी, चांदाचे उपाध्यक्ष तथा बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश कांबळे यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर एज्युकेशन सोसायटी चांदाच्या सदस्या तथा महाविद्यालयातील समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. स्निग्धा कांबळे उपस्थित होत्या.
या प्रसंगी विशेष उपस्थिती म्हणून मराठी विभागप्रमुख प्रो.डॉ.जगदीश मेश्राम, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा.मनोज चांभारे तसेच सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.तुफान अवताडे क्रीडामंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात लेझीम पथकाच्या सुंदर व शिस्तबद्ध सादरीकरणाने झाली. त्यानंतर क्रीडामहोत्सवाची मशाल प्रज्वलित करण्यात आली व फीत कापून क्रीडामहोत्सवाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले.
उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ.राजेश कांबळे यांनी विद्यार्थ्यांनी सर्व क्रीडा स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घ्यावा, असे आवाहन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ. स्निग्धा कांबळे यांनी दि. ०७ ते १३ जाने.२०२६ या कालावधीत होणाऱ्या क्रीडास्पर्धा तथा दि.१५ आणि १६ जाने. २०२६ रोजी होणाऱ्या सांस्कृतिक-बौद्धिक स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना उत्कृष्ट कामगिरीसाठी सदिच्छा दिल्या.या उद्घाटन कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

