ज्ञानगंगा विद्यालय,बेटाळा येथे स्पर्धा परीक्षा, कायदेविषयक पोस्को कायद्याचे मार्गदर्शन.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : तालुक्यातील ज्ञानगंगा विद्यालय , बेटाळा येथे महाराष्ट्र पोलीस स्थापना दिन, रस्ता सुरक्षा सप्ताह अभियान बाबत पोलीस उपनिरीक्षक कदम साहेब तसेच पोलीस हवालदार अरुण पिसे पोलीस स्टेशन ब्रह्मपुरी यांनी नवीन निर्माण झालेले तीन कायदे तसेच पोस्को कायदा मोटार वाहन प्रतिबंधक कायदा अशा प्रकारच्या विविध कायद्याविषयी माहिती तसेच स्पर्धा परीक्षेचे योग्य मार्गदर्शन विद्यार्थी आणि गावकऱ्यांना केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील शिक्षकांनी मोलाचे सहकार्य केले.

