भोंदुबाबा अशोक खरात यांना फाशीची शिक्षा देऊन त्यांचा साथीदारांना अटक करून जादुटोणा विरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करा. - महा.अनिसची मागणी.

भोंदुबाबा अशोक खरात यांना फाशीची शिक्षा देऊन त्यांचा साथीदारांना अटक करून जादुटोणा विरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करा. - महा.अनिसची मागणी.


एस.के.24 तास 


गडचिरोली : ज्योतिषी- भोंदुबाबा अशोक खरात यांनी अनेक महिलावरअत्याचार करून फसवणुक केल्याबदल त्यांना फाशिची शिक्षा घ्यावी तसेच रुपाली चाकनकर व राजकारणी-सरकारी अधिकारी यांना सहआरोपी करून त्यांचेवर गुन्हा दाखल करावा तसेच जादुटोणा विरोधी कायद्याची प्रभावी अमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी महाराष्ट्र अंधश्रध्दा निमुर्लन समिती शाखा गडचिरोलीच्या वतीने निवासी उप जिल्हाधिकारी आशिष वानखेडे यांचे मार्फत मुख्यमंत्री व राज्यपाल यांना निषेध करून निवेदन देण्यात आले.



सदर आंदोलनाचे नेतृत्व अनिस जिल्हाध्यक्ष प्रा.मुनिश्वर बोरकर कार्याध्यक्ष चंद्रशेखर भंडागे सचिव भोजराज कान्हेकर गोपाल रायपुरे महिला प्रमुख संघमित्रा राजवाडे निशाताई बोदेले यांनी केले तर आंदोलनात प्रमोद राऊत दशरथ साखरे तुळसिराम सहारे चोखोबा ढवळे नरेंद्र शेंन्डे जैराम उंदिरवाडे लवकुंश भैसारे नामदेव दुधे नेताजी मेश्राम मोरेश्वर निमगडे अशोक कोल्हारकर शिध्दार्थ भानारकर धनराज पाझारे 


केशव गणविर डोमाजी गेडाम प्रेमदास रामटेके नाजुक भैसारे सुमन उंदिरवाडे अहिल्या सहारे देवला डोंगरे देवला शेंन्डे अमिता भैसारे प्रेमलता कान्हेकर विशाखा देवतळे माया मेश्राम लता भैसारे लता रामटेके शशीकला सहारे मंगला बाबनवाडे वृक्षाली उंदिरवाडे वाजुदा शेख लिला वाकडे ज्योती मेश्राम कल्यांनी गोंडाणे त्रिवेणी मेश्राम रजनी चौरे अनन्या उंदिरवाडे अहिल्या सहारे आदि सहित बहुसंख्य महिला उपस्थित राहून निषेध नोंदविला.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !