शिवजयंती उत्सव समिती तर्फे जिल्हा परिषद शाळेला आर्थिक मदत.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रह्मपुरी : एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या मनी प्रमाणे शिवजयंती उत्सव समिती, अ-हेरनवरगांव यांनी लोकोपयोगी कार्य हाती धरले आहे. त्यांनी गोरगरिबांना आर्थिक मदत, गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्याचा विडा उचललेला आहे.जिल्हा परिषद शाळा, अ-हेरनवरगांव येथील मुलांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळावे म्हणून बंद असलेला आरो दुरुस्तीचा खर्च उचलून मुलांना शुद्ध पाणी पिण्यासाठी दुरुस्त करून दिला.
सदर दुरुस्तीचा खर्च रुपये-३०००/- (तीन हजार) शिवजयंती उत्सव समिती पदाधिकारी संजय ढोरे, मुन्ना टेंभुरकार, राजेश ठेंगरे यांनी मुख्याध्यापक गोन्नाडे यांना दिला.यावेळी ग्रामपंचायत सचिव रतिराम चौधरी, अमरदीप लोखंडे,शिक्षक बांडे,पाथोडे,मून,शिक्षीका,विद्यार्थी उपस्थित होते.केलेल्या आर्थिक मदती बद्दल मुख्याध्यापकांनी शिवजयंती उत्सव समितीचे आभार मानले.

