पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर अपघात : 2 दुचाकीस्वार जखमी,बॅरिकेटचे नुकसान.
एस.के.24 तास
गडचिरोली : शहरातील पोलीस अधीक्षक कार्यालय गडचिरोली मुख्य प्रवेशद्वारासमोर भरधाव चारचाकी वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने दोन युवक जखमी झाल्याची घटना दुपारी अंदाजे 4:25.वा.च्या सुमारास घडली.या अपघातात कार्यालयासमोर उभारण्यात आलेल्या काचांच्या बॅरिकेटचे मोठे नुकसान झाले असून सुमारे 25 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,जखमी युवक आयटीआय ITI प्रशिक्षणासाठी शहरात आले होते.MIDC परिसराकडून मुख्य रस्त्याने जात असताना जिल्हा परिषद कडून भरधाव वेगाने येणाऱ्या स्कॉर्पिओ क्रं.MH.33 AC 9444 या वाहनाने अचानक बाजूच्या रस्त्याने येत दुचाकीला जोरदार धडक दिली.

