वैष्णवी साळवे सिव्हिल इंजिनिअरिंग विभागात टॉपर होण्याचा मिळवला मान.
एस.के.24 तास
नागभीड : नागभीड येथील मुसाभाई नगरमध्ये राहणारी, सामान्य कुटुंबातील मुलगी आणि सरकारी शाळेतून शिक्षण घेतलेली वैष्णवी निलेश साळवे हिने आज आपल्या जिद्द,चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या जोरावर पुणे येथील D. Y. Patil Engineering College .Pune च्या सिव्हिल इंजिनिअरिंग विभागात 9.86. CGPA मिळवत टॉपर होण्याचा मान मिळवला आहे.
साध्या परिस्थितीतून शिक्षण घेत, मोठी स्वप्ने पाहून ती आज यशाच्या शिखरावर पोहोचली आहे. तिच्या या यशामुळे केवळ तिच्या कुटुंबाचा नव्हे तर नागभीड शहराचाही अभिमान वाढला आहे.तिची ही यशोगाथा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे. वैष्णवीला पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा

