युथ फॉर जॉब्स फाउंडेशनतर्फे गडचिरोलीत दिव्यांग युवक - युवतींसाठी रोजगार मेळावा संपन्न.

युथ फॉर जॉब्स फाउंडेशनतर्फे गडचिरोलीत दिव्यांग युवक - युवतींसाठी रोजगार मेळावा संपन्न.


एस.के.24 तास


गडचिरोली : दिव्यांग युवक-युवतींना रोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी 'युथ फॉर जॉब्स फाउंडेशन' गडचिरोलीच्या वतीने शुक्रवारी, दि. १३ फेब्रुवारी २०२६ रोजी एका विशेष रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात दिव्यांग उमेदवार आणि त्यांच्या पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.




रोजगार संधींबाबत मार्गदर्शन : - 


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे जिल्हा समन्वयक ताराचंद साहारे होते. या मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून 'मशरूम ऍग्रो फार्म' (गोगाव) चे संचालक प्रजेश कांबळे आणि 'विरश्री ब्रिज एजन्सी'चे समीर शेंडे उपस्थित होते. प्रजेश कांबळे यांनी दिव्यांगांना स्वतःचा व्यवसाय किंवा नोकरी करण्यासाठी प्रोत्साहित केले, तर समीर शेंडे यांनी त्यांच्या एजन्सीमध्ये उपलब्ध असलेल्या रिक्त पदांची माहिती देऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.


संस्थेच्या योजनांची माहिती : -


कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेचे प्रशिक्षक नितेश सिडाम यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी युथ फॉर जॉब्स फाउंडेशनमार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध कल्याणकारी योजना आणि संस्थेच्या उद्दिष्टांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. 

या मेळाव्यात एकूण १३ हून अधिक दिव्यांग विद्यार्थी व पालकांनी सहभाग नोंदवून रोजगाराबाबत माहिती जाणून घेतली.कार्यक्रमाचे संचालन जिल्हा समन्वयक ताराचंद साहारे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार 'दिव्यांग मित्र' किशोर मेश्राम यांनी मानले. दिव्यांगांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या या उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !