युथ फॉर जॉब फाउंडेशन गडचिरोली यांच्या वतीने चामोर्शी येथे दिव्यांग समारोह संपन्न.

युथ फॉर जॉब फाउंडेशन गडचिरोली यांच्या वतीने चामोर्शी येथे दिव्यांग समारोह संपन्न.


एस.के.24 तास 


चामोर्शी : चामोर्शी येथे दिव्यांग बांधवांसाठी दिव्यांग समारोह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ उपस्थित होते. तसेच कृष्णकांत घोगरे CRY संस्था),कुनघाडा येथील ग्रामसेवक Marathe Sir यांचीही उपस्थिती होती.या कार्यक्रमात एकूण 55 दिव्यांग उमेदवार पालकांसह उपस्थित होते. प्रशिक्षण पूर्ण केलेले, नोकरीत कार्यरत तसेच स्वरोजगार करणाऱ्या उमेदवारांचे स्वागत करण्यात आले.


कार्यक्रमादरम्यान उमेदवारांना विविध शासकीय योजना तसेच UDID कार्ड विषयी सविस्तर माहिती देण्यात आली. गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी पंचायत समितीमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती दिली.CRY संस्थेच्या प्रतिनिधींनी दिव्यांग व्यक्तींना आरोग्य व पोषण विषयक मार्गदर्शन केले,तर ग्रामसेवक मराठे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.


या कार्यक्रमात उमेश बन्सोड यांनी युथ फॉर जॉब फाउंडेशन गडचिरोली च्या कार्याबद्दल माहिती देत रोजगार व स्वरोजगाराच्या संधींबाबत मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे संचालन नितेश सिडाम यांनी केले, तर किशोर मेश्राम यांनी आभार प्रदर्शन केले.तसेच संस्थेचे सहकारी ताराचंद सहारे व वीरेंद्र ढवळे हेही उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !