ग्रा.पं.जाफ्राबाद (ता.सिरोंचा) येथील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी मुख्य दोषींवर कारवाईची मागणी.

ग्रा.पं.जाफ्राबाद (ता.सिरोंचा) येथील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी मुख्य दोषींवर कारवाईची मागणी.


एस.के.24 तास 


सिरोंचा : तालुक्यातील सिरोंचा येथील ग्रामपंचायत जाफ्राबादमध्ये झालेल्या आर्थिक अपहार आणि गैरव्यवहार प्रकरणी मुख्य दोषींवर कारवाई करण्याची जोरदार मागणी करण्यात आली आहे.पत्रकार व तक्रारदार आनंद बापू आशा (रा. टेकडा ताल्ला, ता. सिरोंचा) यांनी मा.जिल्हाधिकारी, गडचिरोली यांना स्मरणपत्र व तीव्र आक्षेप निवेदन सादर करून प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.

सदर प्रकरणी पंचायत समिती सिरोंचाचे गटविकास अधिकारी यांनी चौकशी करून दिनांक १२ मार्च २०२६ रोजी अहवाल सादर केला होता. या अहवालात शासकीय निधीचा थेट अपहार व गंभीर आर्थिक अनियमितता सिद्ध झाल्याचे नमूद आहे.चौकशी अहवालानुसार, सिमेंट रस्ता कामात ₹१८,८००/- चा थेट अपहार, केंद्रचालकास शासन परवानगी

शिवाय ₹२,०६,००४/- मानधन अदा, हातपंप बांधकाम (₹१,१३,३८३/-) व मोबाईल खरेदी (₹६०,०००/-) मध्ये निविदा प्रक्रियेचा अभाव, तसेच रॉयल्टी व TDS रक्कम ₹४१,१५९/- कपात न केल्याने शासनाचे नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीतील रोख रक्कम रोकडवहीत न दाखवता परस्पर वापर केल्याचेही निदर्शनास आले आहे.

या प्रकरणात उपसरपंच यांना संयुक्तपणे जबाबदार धरले असताना, जिल्हा परिषदेकडून केवळ ग्रामसेवक श्री.योगेश्वर भाऊजी कन्नाके यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मुख्य निर्णयकर्त्यांवर कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने जनतेत नाराजी व्यक्त होत आहे.

तक्रारदारांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम ३९(१) अन्वये उपसरपंच यांचे पद रद्द करणे, अपहारीत रक्कम वसूल करणे आणि संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्याची मागणी केली आहे.चौकशी अहवाल प्राप्त होऊनही मुख्य दोषींवर कारवाई न झाल्यास प्रशासनावरील जनतेचा विश्वास कमी होईल,असा इशारा देण्यात आला आहे.आता जिल्हा प्रशासन या गंभीर प्रकरणाची कितपत दखल घेते,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !