भंडारा शिक्षण विभागाचा स्वच्छता ही सेवा उपक्रमाचा गाजावाजा.
नरेंद्र मेश्राम - जिल्हा प्रतिनिधी
भंडारा : महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार जिल्हा शिक्षण विभागाकडून स्वच्छता ही सेवा उपक्रम अंतर्गत शहरातील शालेय विद्यार्थ्यांच्या स्वच्छता रनिग कार्यक्रम जिल्हा प्रशासनाने स्वछतेचा जागर पेटविणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाला भंडारा जिल्हा परीषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी,उपमुख्य कार्यकारी अधिकारी चव्हाण प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी रवींद्र सोनटक्के भंडारा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ. संघमित्रा कोल्हे भंडारा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी शंकर राठोड, विषय तज्ञ रामकृष्ण वाडीभस्मे सर्व शिक्षा अभियानांतर्गत अभियंता काळे व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थीत होते.
या स्वच्छ्ता रन उपक्रमात लालबहादूर शास्त्री विद्यालय, महिला समाज शाळा ,नूतन कन्या शाळा, उर्दु शाळा, संत शिवराम शाळा अश्या अनेक शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग दर्शविला यावेळी भंडारा शहरातील विविध शाळेतील शिक्षक, कर्मचारी आणि शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते. स्वच्छता रनचे आयोजन गांधी चौक भंडारा ते जिल्हा क्रीडा संकुल पर्यंत आयोजित करण्यात आले होते. मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी यांनी हिरवी झेंडी दाखवून स्वच्छ्ता रन ची सुरवात केली.
तर गांधी चौकातील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला माल्यारपण करून स्वच्छतेचा संदेश देण्यात आला मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कूर्तकुट्टी यांनी स्वच्छ्ता रन कार्यक्रमातून स्वच्छ्ता ही सेवेचा महत्त्व सर्वांनी जोपासण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले तर प्राथमिक चे शिक्षणाधिकारी रवींद्र सोनटक्के यांनी स्वच्छतेचा संदेश शालेय विद्यार्थांमार्फत सर्वदूर पर्यंत पोहचली पाहिजे असे मत व्यक्त केले.
तर गटशिक्षणाधिकारी शंकर राठोड यांनी उपस्थित सर्वांनी या कार्यक्रमाला यशस्वी करणाऱ्यांप्रती कृत्यगता व्यक्त करून समारोपीय मार्गदर्शनानंतर विद्यार्थ्यांनी ,शिक्षकांनी व सर्व कर्मचाऱ्यांनी स्वच्छता विषयक शपथ घेतली. व स्वच्छ्ता जोपासणारा संदेश अंगीकृत करण्याचा प्रण केला.

