गडचिरोली ते चंद्रपूर महामार्गांवर वैनगंगा नदी जवळ ट्रकच्या धडकेत मेंढपाळ गंभीर जखमी.
📍23 शेळ्या - मेंढ्या चिरडल्या 27 जखमी ट्रक चालक फरार.
सुरेश कन्नमवार - मुख्य संपादक
गडचिरोली : मेंढपाळ समाजाच्या लोकांना नेहमी संकटाना सामना कधी वनविभाग तर कधी शेतकरी चारा टंचाई असल्यामुळे गावोगाव भटकंती करावा लागतो.तर कधी जिल्हा बाहेर चराईसाठी बिर्हाड घेऊन दुसऱ्या जिल्हात जावे लागतो.जेव्हा जाण्यासाठी एक मार्ग असला की शेळ्या - मेंढ्या महामार्गावरून नेतांना मागे - पुढे मेंढपाळ असतात नदी असल्यामुळे पुलावरून नेल्याशिवाय पर्याय नसतो.शेळ्या - मेंढ्या नेतांना गडचिरोली ते चंद्रपूर महामार्गावर भंयकर थरकाप उडणारी मेंढपाळ बांधवासोबत घटना घडली.
दिनांक,05/03/2026 गुरुवार ला सकाळी 7:00.वा. मौजा,मु. पो.दुधमाळा ता.धानोरा जिल्हा.गडचिरोली येथून बिरा पोचू पेद्दीवार वय,60 वर्ष व त्यांचा मुलगा अमोल बिरा पेद्दीवार वय,29 वर्ष दुधमाळा,त्यांचा नातेवाईक, शाहीर आसू मेड्डीवार वय, 24 वर्ष,रा.सोनापूर ता. चामोर्शी जि.गडचिरोली तिघे जण बिरा पोचू पेद्दीवार यांच्या मालकीचे एकूण - 250 नग शेळ्या - मेंढ्या बिर्हाड घेऊन गडचिरोली मार्गे चंद्रपूर जिल्हातील सावली तालुक्यातील कोंडेखल येथील विजय जिगरवार त्यांच्या जावयाकडे गडचिरोली शहर पार करून हायवे रोड ने जात होते.
पारडी फाट्याजवळ सांयकाळी 6:00 ते 6:15 वा.दरम्यान पाठीमागून गडचिरोली कडून चंद्रपूर कडे भरधाव फुल लोड असलेली अशोक लैलॅन्ड कंपनी ची ट्रक क्रं.CG.08 AX 6371 चा चालक यांनी ट्रक भरधाव वेगात आणून लहान - मोठे 23 नग शेळ्या - मेंढ्यांना चिरडत नेऊन ठार मारले.
त्यांची किमंत,3 55,000,00/- (तिन लाख पंचावन्न हजार) व 27 नग शेळ्या - मेंढ्या जखमी केले.किंमत, 200,000.00/- (दोन लाख रुपये)अंदाजे,5,55,000/- (पाच लाख पंचावन्न हजार) रु.चे नुकसान केले.गाडीच्या दोन्ही साईट च्या चाका मध्ये व मध्यभागी शेळ्या - मेंढ्या अडकल्यामुळे गाडी ज्याम झाली गाडी पुढे जात नव्हती म्हणून वाहन चालक घटना स्थळावर सोडून पळून गेला.
![]() |
मेंढपाळ बिरा पोचू पेद्दीवार वय,60 वर्ष यांच्या डोक्याला व कंबर पायाला मार लागल्याने गंभीर जखमी झाले.त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालय,गडचिरोली येथे भरती करण्यात आले. उपचार सुरु आहे.
अशोक लैलॅन्ड कंपनी ची ट्रक क्रं.CG.08 AX 6371 चा अज्ञात चालक यांनी त्यांच्या ताब्यातील वाहन रस्त्याचे परिस्थिती कडे न पाहता भरधाव वेगाने व हयगयीने वाहन चालवून 23 नग लहान - मोठे शेळ्या - मेंढ्या चिरडल्या गेल्या. 27 नग शेळ्या - मेंढ्या जखमी.मेंढपाळ बिरा पोचू पेद्दीवार जखमी झाले.
अज्ञात चालका विरुद्ध अधिनियम,भा.न्या.सं (BNS),2023 कलम 281),अधिनियम,भा.न्या.सं (BNS),2023 कलम 125(a), अधिनियम,भा.न्या.सं (BNS),2023 कलम 324(5),अधिनियम,भा.न्या.सं (BNS),2023 कलम 325,मोटर वाहन अधिनियम, 1988,कलम,187 अंतर्गत पोलीस स्टेशन,गडचिरोली गुन्हा नोंद करण्यात आला.
घटनास्थळाचा पंचासमक्ष पंचनामा करून पुढील तपास पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पोउपनि.अतुल तराळे,पोउपनि.शिवाजी देशमुख, पोउपनि.भास्कर ठाकरे व वाहतूक पोलीस कर्मचारी करीत आहेत.




