कॅन्सर तपासणी हॉस्पिटल शेवटच्या दिवसाला मौजा.व्याहाड खुर्द केंद्रा वर शेकडो नागरिकांनी घेतला लाभ.
एस.के.24 तास
चंद्रपूर : दिनांक १६ ऑक्टो.२०२३ आज सावली तालुकातील मौजा.व्याहाड खुर्द येथे विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या विशेष प्रयत्नातून व विजय किरण फाउंडेशन तर्फे कॅन्सर तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.ह्या कॅन्सर तपासणी हॉस्पिटल गाडीचा पहिला टप्पा ६ सप्टेंबर ते १३सप्टेंबर तसेच २५ सप्टेंबर ते १६ ऑक्टोबर हा दुसरा टप्पा सावली तालुक्यातील नागरिकासाठी शिबिरासाठी उपलब्ध होता आज मौजा.व्याहाड खुर्द केंद्रावर या शिबिराची सांगता करण्यात आली.
स्क्रिनिंग आऊटपुटच्या आधारावर रुग्णाला पुढील तपासणीची आवश्यकता असल्यास डॉक्टरांची टीम रुग्णाला पुढील उपचारासाठी घेऊन जाईल.उपेक्षित लोकसंख्येला कर्करोगावर मोफत निदान आणि उपचारांचे फायदे देणे हे उपक्रमाचे अंतिम ध्येय आहे.आज व्याहाड खुर्द केंद्रावर, मोखाळा,नवेगाव,राजोली चक नं.१ व राजोली फाल,चिचबोडी,व्याहाड खुर्द, किसाननगर या गावातील नागरिकांनी कॅन्सरची तपासणी केली असून आता पर्यत तालुक्यात ५००० च्या वरती नागरिकांनी आपली कर्करोग तपासणी केली असून डॉक्टरांनी पॉसिटीव्ह असलेल्या रुग्णांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हॉस्पिटल, नागपूर येथे पुढील उपचाराकरिता रेफर केले आहे.
कॅन्सर तपासणी शिबिराला सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नितीन गोहणे,व्याहाड खुर्दच्या सरपंच सौ.सुनीता उरकुडे,माजी सरपंच व विद्यमान ग्रा.पं.सदस्य मा.केशव भरडकर,सेवा सहकारी सोसायटी अध्यक्ष मा.दीपक जवादे,कृषी उत्पन्न बाजार समिती सावलीचे संचालक मा.निखिल सुरमवार,माजी सरपंच जनाबाई जवादे,मा.कुमदेवजि उरकुडे,नवेगावचे माजी सरपंच मा.पांडुरंग मेश्राम, सामाजिक कार्यकर्ते किसान नगर मा.किशोर बीके व जनसंपर्क कार्यालय प्रमुख मा.कमलेश गेडाम यांची उपस्थिती होती तर.या शिबिराला संपन्न करण्यासाठी अमोल भोयर, विक्रांत भरडकर,निखिल दहेलकार,सुनील तुंगीडवार,योगनाथ मानकर,प्रशांत तिवाडे यांनी विशेष सहकार्य केले.

