अपक्ष आमदार किशोर जोरगेवार " वेट अँड वॉच " च्या भूमिकेत ; " महायुती की महाविकास आघाडी "
प
एस.के.24 तास
चंद्रपूर : यंग चांदा ब्रिगेडच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय असलेले महायुती सरकार मध्ये सहभागी अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांना भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी फोन करून महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास येण्याची विनंती केली तथा काँग्रेस जिल्हाध्यक्ष,आमदार सुभाष धोटे,काँग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी घरी प्रत्यक्ष भेट देवून आम्माचा आशीर्वाद घेतला.
तरीही आमदार जोरगेवार यांनी कार्यकर्त्यांना “ वेट अँड वॉच ” असा सल्ला देत महायुती व महाविकास आघाडी यापैकी कुणीहीकडे सध्या जाऊ नका,असे म्हटले आहे.कधी काळी भाजपत सक्रीय असलेले चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार लोकसभा निवडणुकीत काय भूमिका घेतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत जोरगेवार यांनी शिवसेना कडून लढताना ५२ हजारापेक्षा अधिक मते घेतली.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस असे करताना अपक्ष निवडणूक लढविली आणि ७५ हजारापेक्षा अधिक मताधिक्याने विजयी झाले. चंद्रपूर विधानसभा मतदार संघात जोरगेवार यांचे संघटन मजबूत आहे.
यंग चांदा ब्रिगेडच्या माध्यमातून युवकांसोबताच महिला व युवतींच्या संघटनेची अतिशय मजबूत बांधणी त्यांनी केली आहे.मात्र लोकसभा निवडणुकीत दुरूनच ते सर्व बघत आहेत.भाजप व काँग्रेस या दोन्ही पक्षांनी उमेदवार जाहीर केले.प्रचारही सुरू झाला.मात्र जोरगेवार यांनी अजूनही भूमिका जाहीर केलेली नाही.महायुती सरकार मध्ये जोरगेवार सहभागी आहेत.मात्र महायुतीच्या उमेदवाराकडून अजूनही त्यांच्याशी संपर्क नाही.
महायुतीचे सुधीर मुनगंटीवार यांनी नामांकन दाखल केले त्या दिवशी २६ मार्च रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा फोन होता.नामांकन दाखल करण्यास या असे निमंत्रण दोन्ही नेत्यांनी दिले.मात्र,अगदीच वेळेवर फोन आल्याने व स्थानिक उमेदवाराने संपर्क केला नाही.
त्यामुळे जाता आले नाही असे जोरगेवार म्हणाले. तसेच काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांनी घरी येऊन चर्चा केली व सोबत येण्याचे निमंत्रण दिले.काँग्रेस उमेदवार आमदार प्रतिभा धानोरकर यांनीही घरी भेट दिली,अम्माचा आशीर्वाद घेतल्याची माहिती दिली.सध्या तरी यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना महायुती व महाविकास आघाडी या दोघांन पासून दूर राहण्यास सांगितले आहे.आम्ही वेट अँड वॉच च्या भूमिकेत आहे. कार्यकर्त्यांशी संवाद साधणार त्यानंतर बघू असे आमदार जोरगेवार म्हणाले.