आरमोरी येथील अभियंत्याचा वैनगंगा नदीत बुडून मृत्यू : 2 महिन्यांपूर्वीच मिळाली होती नोकरी..!
एस.के.24 तास
आरमोरी : मित्रांसोबत आंघोळ करण्यासाठी गेलेल्या युवा अभियंत्याचा वैनगंगा नदीत बुडून मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी आरमोरी येथे घडली.शुभम नामदेव रामटेके वय,25 वर्ष रा.गायकवाड चौक,आरमोरी असे मृत युवकाचे नाव आहे.
रंगपंचमीचा दिवस असल्याने आज शुभम आणि मित्रांनी एकमेकांना रंग लावले. त्यानंतर सर्वजण वैनगंगा नदीवर आंघोळीला गेला. परंतु अंदाज न आल्याने खोल पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. मित्रांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना यश आले नाही. पोलिसांनी नागरिकांच्या साह्याने शुभमचा मृतदेह बाहेर काढला.
शुभमचे वडील नामदेव रामटेके यांना एक मुलगा व एक मुलगी आहे.ते कबाडीचा व्यवसाय करतात.अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत त्यांनी शुभमला अभियांत्रिकीचे शिक्षण दिले. दोन महिन्यांपूर्वीच त्याला एका कंपनीत नोकरी मिळाली होती. परंतु काळाने आज त्याच्यावर घाला घातला.

