कवी - जीवन खोब्रागडे यांच्या लेखणीतून...
!! धोक्याच्या लाटे मधून. !!
अंधश्रद्धा माध्यमात
भक्तांची गर्दी वाढली
विज्ञान मागे टाकून
सुज्ञही सामील झाली...
या आधुनिक काळात
प्रगती थांबून गेली
राजा बोले जन डोले
डोक्याने बधीर झाली...
दिवे थाळी वाजवून
कोरोना परत आला
अंधश्रद्धा पिपासू ही
प्रचारक होत गेला...
पेपर फुटी करून
स्पर्धाच टाळली गेली
ना पैसा परत केला
ना नोकरी हाती आली...
शिकून काय फायदा
शिक्षित झाला अडाणी
अशिक्षितांच्या रांगेत
रोज भरतोया पाणी...
देश वाचवण्यासाठी
जनतेने पुढे यावे
धोक्याच्या लाटे मधून
स्वातंत्र्य शोधून घ्यावे...
कवी : - जीवन खोब्रागडे
टेक्नो रेसिडेन्सी,नागपूर

