मुल तालुक्यातील टोलेवाही येथील महिला वाघाच्या हल्ल्यात ठार.
राजेंद्र वाढई - उपसंपादक
मुल : मुल तालुक्यातील टोलेवाही ते भगवानपूर रोड च्या पोल्ट्री फार्म जवळ महिला आज दिनांक, 27/05/2025 मंगळवार ला सकाळी 8:00 वा.सरपन गोळा करण्याकरिता गेली असता दब्बा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून संजवना संजय मॅकलवार वय,42 वर्ष हि जागीच ठार झाली.
हि घटना कपार्टमेंट 524 मध्ये झाली.या घटनेची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरली. यावेळी ग्रामस्थानी घटनास्थळाकडे धाव घेतली. तेव्हा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात जंगलात पडून होता.वनपरीक्षेत्र मुल चे अधिकारी व चिरोली चे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.व शवविच्छेदन करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय मुल येथे नेण्यात आले.
दररोज परीसरातील भगवानपूर येथील शालेय विद्यार्थी चिरोली येथे पायदळ व सायकल ने ये - जा करीत असतात.तरी लवकरात लवकर वाघाचा बंदोब बंदोबस्त करावा.भगवानपूर,टोलेवाही,कांतापेठ,चिरोली,येथील ग्रामस्थांनची मागणी आहे.