मुल तालुक्यातील कांतापेठ येथील दुसरा गुराखी बळी ; एकाच दिवशी त्याच वाघाने घेतला दोघांचा बळी.
राजेंद्र वाढई - उपसंपादक
मुल : एकाच दिवशी त्याच वाघाने दोघांचा बळी घेतल्याने परिसरातील गावात वाघाची चांगलीच दहशत पसरली आहे.घटनेचे सविस्तर वृत्त असे की, मुल तालुक्यातील चिरोली येथील बेघर वस्तीत राहणारी महिला आधार कार्ड वरील नाव नंदा तर व्यावहारिक नाव (संजीवनी) संजय मॅकेलवार वय (४७) ही मंगळवार दिनांक २७ रोजी सकाळी ९ च्या सुमारास लागूनच असलेल्या पुनर्वसित गाव भगवानपूर येथील FDCM वनविकास महामंडळाच्या जंगलात कक्ष क्रमांक ५२४ च्या जंगलात इंधनासाठी सरपण (काळया) आणण्यासाठी गेली असता झुडुपात दबा धरुन बसलेल्या वाघाने महिलेवर हल्ला करून जागीच ठार केले.
एका आठवड्यातील ही दुसरी घटना असून १७ दिवसातील १० वा महिलेचा वाघाने घेतलेला बळी असल्याची चर्चा नागरिकांमध्ये केली जात असतानाच पुन्हा त्याच दिवशी दुपारी १२.३० वाजता मुल तालुक्यातील मौजा कांतापेठ येथील सुरेश मंगरू सोपणकर वय (४५) हा इसम शेळ्या बकऱ्या चारण्यासाठी गेला असता त्याच FDCM च्या ५२४ क्षेत्रात सुरेश सोपणकर यांच्यावर त्याच वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना घडली.
याबाबत गावातील नागरिका व वनविकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना माहिती कळली असता शेळ्या राखणाऱ्या सुरेश सोपणकर याचा जंगलात शोध घेण्यासाठी वन
अधिकारी,कर्मचारी व गावकरी जंगलात गेले असता वाघ सुरेशच्या छातीवर बसून असल्याचे शोधणाऱ्या दिसून आले आहे. शेतकरी,गुराखी व जनता वाघाच्या सारख्या घडत असलेल्या दहशतीने धास्तावली असून जंगलाला लागून असलेल्या शेतीकडे जाण्यासाठी शेतकरी व गुराखी सुद्धा घाबरला आहे.
सकाळच्या घटनेची माहिती वनविकास महामंडळाचे FDCM विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस. बी. बोथे, वनपाल ची.आर.शिंदे, पोलिस निरीक्षक सुबोध वंजारी व त्यांची टीम, प्राणी मित्र उमेश झिरे व त्यांचे सहकारी मित्र, वनरक्षक गव्हारे ,वनरक्षक जाणला बीट उमेश गवई, वनरक्षक अशोक सिंघण, घटनास्थळी तात्काळ दाखल झाले असून मोका पंचनामा करून महिलेचा प्रेत शवविच्छदनासाठी उपजिल्हा रुग्णालय मुल येथे हलविण्यात आले.
FDCM वनविभागाच्या नियमानुसार मृतकाच्या वारसदारास ३० हजाराची आर्थिक मदत केली. सकाळी ठार केलेल्या महिलेवर अंत्यसंस्कार होण्याच्या अगोदरच परत त्याच वनक्षेत्रात दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास शेळ्या चारणारा गुराखी सुरेश सोपणकर यांच्यावर हल्ला करून ठार केल्याने त्याचाही शोध घेण्यात आला असून घटनास्थळी FDCM चे अधिकारी कर्मचारी, पोलिस अधिकारी व त्यांची टीम हजर होऊन दुपारच्याही घटनेचा मोका चौकशी व पंचनामा करून प्रेत शव विच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यासाठी हालचाली सुरु झाल्याने कांतापेठ येथील नागरिक चांगलेच भडकले.
जो पर्यंत FDCM वनविकास महामंडळाचे DFO घटनास्थळी येत नाही,तो पर्यंत प्रेत उचलण्यात येऊ नये अशी भूमिका घेतल्याने FDCM विभागाचे DFO जी. ए. मोटकर, सहायक व्यवस्थापक आर.एस.कदम, वनपरिक्षेत्र अधिकारी एस.बी. बोथे तात्काळ घटनास्थळी हजर झाले.
जी.ए.मोटकर, सहायक व्यवस्थापक आर.एस.कदम, वनपरिक्षेत्र अधिकारी एस.बी.बोथे तात्काळ घटनास्थळी हजर झाले. ग्रामस्थांकडून दोन्ही मृतांच्या वारसदारांना उपस्थित झालेल्या नागरिकांनी काही मागण्या केल्या त्या मागण्या लेखी स्वरूपात लिहून घेण्यात आल्या असून मागण्याची पूर्तता त्वरित करावी अशी मागणी कांतापेठ व चिरोली ग्रामस्थानी केली.
त्यानुसार DFO यांनी मागण्या मान्य केल्याचे लेखी लिहून दिले. तेव्हाच प्रेत शव विच्छेदनासाठी उपजिल्हा रूग्णालय येथे आणण्यात आले. याप्रसंगी कांतापेठ येथील महिला सरपंच, प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
DFO यांनी लेखी दिलेल्या मागण्या :-
१) मृतकाच्या कुटुंबियांच्या पालन पोषण करण्याची जबाबदारी FDCM अधिकाऱ्यांची राहील.
२) भगवानपूर,कांतापेठ, टोलेवही, जानाला, आगडी, शेतशिवारालां तारेचे कुंपण करण्यात येईल.
३) रस्त्याचे खडीकरण करून देण्यात येईल.
४) नरभक्ष वाघास त्वरित जेरबंद करण्यात येईल.
५) संबंधित गावातील शाळेच्या विद्यार्थ्यांना बसची सुविधा करण्यात येईल. इत्यादी मागण्या लेखी स्वरूपात मान्य करून लिहून घेण्यात आल्या.
लगातार होणाऱ्या वाघाच्या घटनेने मुल तालुक्यातील जंगल लगतच्या गावांना दहशतीचे वातावरण पसरले आहे. जनताही भयभीत झाली आले