‘‘ एक गाव - एक वाचनालय ’’ उपक्रमाची फलश्रुती- स्पर्धा परीक्षा सराव पेपर मध्ये दुर्गम भागातील विद्याथ्र्यांचा मोठा सहभाग.
एस.के.24 तास
गडचिरोली (दि.26/05/2025) गडचिरोली जिल्ह्रातील बहुतांश विद्यार्थी हे दुर्गम-अतिदुर्गम भागात राहतात. त्यामुळे तेथील विद्याथ्र्यांना योग्य मार्गदर्शन व संधीचा अभाव आहे. तसेच दुर्गम - अतिदुर्गम भागात राहणाया विद्याथ्र्यांना स्पर्धा परीक्षेबद्दल असलेल्या अज्ञानामुळे, त्यांना मिळत नसलेल्या योग्य मार्गदर्शनाच्या अभावामुळे विद्यार्थी हे स्पर्धा परीक्षेत मागे पडत आहेत.
करीता शालेय विध्यार्थी मध्ये वाचनाची व स्पर्धापरीक्षा विषयीची ओढ निर्माण व्हावी, त्यांची उज्वल भविष्याकडे वाटचाल व्हावी व त्यांचा स्पर्धा परीक्षेकडे कल वाढावा तसेच त्यांना स्पर्धा परीक्षेच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी गडचिरोली पोलीस दल पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून व यशोरथ स्पर्धा परीक्षा टेस्ट सिरीज,मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने
“ प्रोजेक्ट उडान ” अंतर्गत काही दिवसांनी सुरु होणाया स्पर्धा परीक्षेच्या पाश्र्वभूमीवर दिनांक 26/05/2025 रोजी गडचिरोली पोलीस मुख्यालय येथील शहीद पांडु आलाम सभागृह तसेच एक गाव एक वाचनालयांतर्गत गडचिरोली जिल्ह्रातील पोस्टे/उपपोस्टे/पोमकें ठिकाणी उभारण्यात आलेल्या प्रत्येक वाचनालयामध्ये मोफत स्पर्धा परीक्षा सराव पेपर क्र. 06 टेस्ट सिरीज चे आयोजन करण्यात आले होते.
या सराव पेपरचा उपयोग विद्याथ्र्यांना येणाया पोलीस शिपाई भरती, वनरक्षक भरती, तलाठी भरती, संयुक्त परीक्षा तसेच विविध स्पर्धा परीक्षेकरिता होणार आहे. यावेळी सदर स्पर्धा परीक्षा सराव पेपर करीता पोलीस मुख्यालय व विविध पोस्टे/उपपोस्टे/पोमकें स्तरावरुन एकुण 3500 विद्याथ्र्यांनी परीक्षा दिली. दुर्गम भागातील भामरागड, अहेरी, एटापल्ली, हेडरी व सिरोंचा या ठिकाणी ही विद्याथ्र्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. तसेच विशेष बाब म्हणजे नव्याने उभारण्यात आलेल्या पोलीस मदत केंद्र, पेनगुंडा हद्दीतील 18 व पोलीस स्टेशन नेलगुंडा हद्दीतील 19 विद्याथ्र्यांनीही या सराव पेपरमध्ये सहभाग घेतला.
अनेक ठिकाणी सार्वजनिक वाचनालय तसेच ग्रामपंचायत कार्यालयाच्या ठिकाणी परीक्षा घेण्यात आल्या. स्थानिक शहीद पांडु आलाम सभागृहामध्ये घेतलेल्या सराव पेपरमध्ये 1300 विद्याथ्र्यांनी सहभाग घेतला. सदर सराव पेपरवेळी अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री.एम रमेश यांनी उपस्थिती दर्शवून विद्याथ्र्यांचे मनोबल वाढविताना सांगितले की
ही टेस्ट सिरिज म्हणजे केवळ सराव नव्हे तर विद्याथ्र्यांच्या आत्मविश्वासाला चालना देणारा महत्त्वपूर्ण टप्पा आहे.यामुळे परीक्षेपूर्वीचा अनुभव मिळेल, स्वत:ची तयारी तपासता येईल आणि कमतरतेवर काम करण्याची दिशा स्पष्ट होईल.
पोलीस अधीक्षक श्री.नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्ह्रातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोस्टे/ उपपोस्टे/पोमकेचे सर्व प्रभारी अधिकारी तसेच नागरी कृती शाखेचे पोउपनि. चंद्रकांत शेळके व सर्व पोलीस अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.