गडचिरोली भाजप जिल्हाध्यक्षपदी रमेश बारसागडे यांची नियुक्ती.
एस.के.24 तास
गडचिरोली : भाजप ने राज्यभरातील कार्यकारिणीत बदल करीत १३ मे रोजी जिल्हाध्यक्षांची घोषणा केली होती. संघटन पर्व अंतर्गत हे बदल करण्यात आले. २२ जिल्ह्यांबाबत निर्णय राखून ठेवला होता. गडचिरोलीचा समावेश होता. अखेर ३१ मे रोजी प्रदेश कार्यालयाने उर्वरित जिल्हाध्यक्षांची यादी जाहीर केली.
यात गडचिरोली भाजप जिल्हाध्यक्षपदी रमेश बारसागडे यांची नियुक्ती करण्यात आली.प्रशांत वाघरे यांच्या जागी बारसागडे यांच्या रुपाने नवा मोहरा दिला.
रमेश बारसागडे हे चामोर्शीतील शिवाजी महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधून त्यांच्या राजकारणाची सुरुवात झाली. नंतर ते भाजपवासी झाले. २०१७ मध्ये त्यांनी कुनघाडा जि.प.गटातून भाजपकडून नशीब आजमावत विजय मिळवला.जि.प. मध्ये कृषी सभापतीपदही भूषविले.शांत,संयमी नेतृत्व म्हणून त्यांची पक्षात ओळख आहे.