सरकारी नोकरी व पेट्रोल पंप ची डीलरशिप मिळवून देण्याचे आमिष दाखवून दोन व्यक्तींना ६५.१४ लाख रुपयांनी फसवणूक केले.
📍रोशनी नाकतोडे आणि रोमल नाकतोडे ब्रह्मपुरी आरोपींची नाव आहेत.आरोपी पसार झाले असून त्यांचा शोध सुरू.
एस.के.24 तास
ब्रम्हपुरी : दोन व्यक्तींना सरकारी नोकरी मिळवून देण्याचे आणि एकाला पेट्रोल पंपची डीलरशिप मिळवून देण्याचे आमिष दाखवून ब्रह्मपुरीतील नाकतोडे दाम्पत्याने ६५.१४ लाख रुपयांनी फसवणूक केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर पीडितांनी नाकतोडे दाम्पत्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली.
त्यानुसार आरोपींविरोधात कलम ४२०, ४०७, ३४ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला.रोशनी नाकतोडे वय,29 वर्ष आणि रोमल नाकतोडे वय,37 वर्ष दोघेही राहणार विदर्भ कॉलनी,मालडोंगरी रोड, ब्रह्मपुरी,अशी या आरोपींची नावे आहेत.आरोपी पसार झाले असून त्यांचा शोध सुरू आहे.
१ एप्रिल २०२२ ते ४ एप्रिल २०२४ या कालावधीत रोशनी आणि रोमल यांनी लाखांदुरातील वॉर्ड क्रमांक ११ मधील शिवनगरी लेआउट येथे राहणारे रुपेश गावतुरे (४६) यांना पेट्रोल पंपची डीलरशिप देतो,असे सांगून त्यांची ५३ लाख २८ हजार ८३७ रुपयांनी फसवणूक केली.
रूपेश यांचा मेहुणा नितेश गुरनुले हा देखील या दाम्पत्याच्या संपर्कात आला.सरकारी नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली त्याच्याकडूनही ५३ हजार २८९ रुपये घेतले.एवढेच नाही तर, समीर ब्राह्मणकर यांच्या कडून ग्रामसेवकाची नोकरी मिळवून देण्याच्या नावाने ११ लाख ३२ हजार रुपये उकळले.
दोन वर्षे उलटून गेल्यानंतरही रूपेश गावतुरे यांना ना पेट्रोल पंप मिळाला ; ना नितेश आणि समीर ला नोकरी मिळाली.रक्कमही परत मिळाली नाही. एकाच शहरातील तिघांना लाखोंचा गंडा घालणारे दाम्पत्य आपले वर पर्यंत संबंध असल्याचे भासवून आणि गोड बोलून दोन वर्षे त्यांच्याकडून पैसे घेत होते.अखेर आपली फसवणूक होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
पीडितांनी लाखांदूर पोलिसात तक्रार दाखल केली. रूपेश गावतुरे यांच्या तक्रारीवरून लाखांदूर पोलिस ठाण्यात दोन्ही आरोपी विरुद्ध फसवणुकीच्या वेगवेगळ्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर पोलिसांनी त्यांच्या ब्रह्मपुरी पत्त्यावर जाऊन शोध घेतला.ते पसार झाले असल्याचे आढळले.या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक,सचिन पवार करीत आहेत.