व्याहाड (बुज) नंदीनी बार समोर सायकल स्वाराला वाचवितांना स्कॉर्पिओ पलटी झाल्याने चालकाचा जागीच मृत्यू ; एक गंभीर जखमी.
सुरेश कन्नमवार ! मुख्य संपादक ! एस.के.24 तास
सावली : सावली तालुक्यातील चंद्रपूर - गडचिरोली महामार्गावर व्याहाड (बुज) नंदीनी बार समोर दिनांक,17/05/2025 शनिवार ला अपघात झाला.
गडचिरोली वरून व्याहाड (बुज) कडे येत असलेली MH.33 AC 8712 क्रमांक ची स्कॉर्पिओ अचानक रस्त्यावर आलेल्या सायकल स्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात गाडी अनियंत्रित होऊन गाडीचा मागील टायर फुटल्याने गाडीचे नियंत्रण सुटले आणि गाडी दोन - तीन वेळा पलटी झाली.
या अपघातात स्कॉर्पिओ चालक अनिरुद्ध कोवे वय,25 वर्ष रा.केरोडा ता.सावली जिल्हा.चंद्रपूर यांचा जागीच मृत्यु झाला.
सोबत असलेला सहकारी गंभीर जखमी असून त्याला तातडीने सामान्य रुग्णालय,गडचिरोली येथे हलविण्यात आले.दुदैवाने अनिरुद्ध कोवे यांना दवाखान्यात नेण्यापूर्वीच मृत्यु झाला.या घटनेची माहीती मिळताच सावली तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते तसेच जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस दिनेश पाटील चिटणुरवार यांनी सामान्य रुग्णालय,गडचिरोली येथे देऊन विचारपूस केली.
या अपघाताने परीसरात व केरोडा गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
या घटनेची माहिती मिळताच सावली पोलीस स्टेशन चे ठानेदार,प्रदीप पुल्लुरवार व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.व पुढील तपास सुरु आहे.