सावली तालुक्यातील पाथरी येथील नवीण ठाणेदारांनी अवैध धंदेवाल्यांच्या आवळल्या मुसक्या.
📍फोफावत असलेल्या अवैध धंदेवाल्यांचे चांगलेच धाबे दणाणलेले.
एस.के.24 तास
सावली / पाथरी (सुजीत भसारकर) : सावली तालुक्यातील पाथरी पोलीस स्टेशन येथील ठाणेदार यांनी पदभार घेताच अवैद्य दारू विक्रेत्यावर कारवाई केली असल्याने डोके वर काढत असलेल्या अवैध्य व्यवसायिकांचे चांगलेच धाबे दनानलेले आहेत पाथरी पोलीस स्टेशन हद्दीतील भाग जंगल व्याप्त असल्याने दारू विक्री, रेती
गोणखणीज अशा प्रकारे बरेच अवैध्य व्यवसायिकांनी आपले डोके वर काढले होते परंतु पाथरी येथे नवीन ठाणेदार रुजू होताच अशा लोकांवर नवीन ठाणेदार आळा बसेवेल काय अशा प्रश्नांची कुजबूज नागरिकांत चालू असतांना दबंग रित्या अवैध्य व्यवसायिकांवर कारवाई केल्याने सगळ्यांच्या बोलत्या बंद झालेले आहेत व आता अवैध्य धंदेवाल्यांची वाट लागनार असल्याचे नागरिकात बोलले जात आहे.
नवीन ठाणेदार यांनी पदभार हाती घेताच गस्ती वर असताना बारसागड रोडनी मेहा (बु) मार्गे दारूची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळतात ठाणेदार यांनी बुधवार रोजी रात्रोच्या सुमारास नाकाबंदी करून मेहा (बु) गावाजवडील नहराचा फुलावर MH-29-J-0448 मारुती 800 वाहन थांबवली असता पंचासमक्ष पाहणी केली.
कारच्या मागच्या सीट वर देशी दारूचे 20 बॉक्स आढळून आले असता आरोपी रमेश राजू ताडपल्लीवर (42)रा.अंतरगाव विनापरवाना वाहतूक करीत असल्याने त्यांच्या कडून 90 मि.ली.ने भरलेल्या देशी दारूचे 20 बॉक्स ज्यांची अंदाजे किंमत 70 हजार रुपये व मारुती 800 वाहनाची अंदाजे किंमत 80 हजार रुपये असा एकूण एक लाख पन्नास हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून त्याच्यावर अप. क्र.57 /2025 कलम 65(अ )मदका अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
असून सदरची कारवाही मा.पोलीस अधीक्षक श्री मुमक्का सुदर्शन,चंद्रपूर. मा.अ. पो. अ. रीना जणबंधू, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुधाकर यादव, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन पाथरीचे ठाणेदार नितेश डोर्लीकर, पो.उ.नि. खोब्रागडे,यशवंत कोसमशिले, बळीराम बारेकर,प्रवीण कोवे, अमित मस्के,गजेंद्र ढेंगळे,खेलेश कोरे, शोभना सुरे यांनी केलेली आहे.