ब्रेकिंग न्युज...
शेतातील झोपडी वर वीज पडून 25 वर्षीय महिला ठार ; 3 जण गंभीर जखमी.
एस.के.24 तास
राजुरा : राजुरा तालुक्यातील कोहपरा येथील ज्योत्स्ना प्रमोद कानमपल्लीवार वय,२५ वर्ष या तरुणीचा विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना आज दुपारी शेतात घडली.
मिळालेल्या माहितीनुसार,मृत ज्योत्स्ना या आपल्या शेतात काम करत असताना अचानक पाऊस सुरू झाला. त्यामुळे त्यांनी शेतातील खोपडीत निवारा घेतला असता अचानक वीज कोसळली आणि त्यात ज्योत्स्ना यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेत तिचे पती प्रमोद कानमपल्लीवार,सासू तसेच आणखी एक व्यक्ती गंभीर जखमी झाले असून त्यांना तात्काळ चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
मृत ज्योत्स्ना यांच्या मागे दोन लहान मुले असून, अचानक झालेल्या या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. स्थानिक प्रशासनाकडून पंचनामा करण्यात येत असून,आपत्ती व्यवस्थापनाच्या माध्यमातून मदत मिळविण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.