मुल तालुक्यातील बेंबाळ येथील कुरमार समाजातील मेंढपाळ रामदास शिगुलवार यांचा मुलगा रोहित शिगुलवार हे अग्निवीर (आर्मी) याचे प्रशिक्षण पूर्ण करून आल्याने गावात जंगी स्वागत.
एस.के.24 तास
मुल : दिनांक,7/6/2025 शनिवार ला मुल तालुक्यातील बेंबाळ येथे मेंढपाळ कुटुंबातील श्री. रामदास सिगुलवार यांचा मुलगा रोहित रामदास शिगुलवार हे अग्निवीर (आर्मी ) याचे प्रशिक्षण व आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करून घरी परत आले.
त्यांनी प्रशिक्षण पूर्ण करून गावात आल्याने आई - वडील भाऊ,नातेवाईक गावातील मित्र मंडळी गावकरी मोठ्या उत्साहात आणि थाटा-माटात स्वागत केले.यामध्ये पूर्ण परिवार व नातेवाईक गावातील मंडळींनी आणी मित्रमंडळी यांचे सहभाग होते.आणि प्रत्येक कुटुंबातील मुलगा जर जिद्दीने आणि मनाच्या पूर्ण तयारीने प्रयत्न केले.तर आपल्याला यश नक्की मिळते हे रोहित यांनी सिद्ध करून दाखविले.
प्रत्येक कुटुंबातील मुलांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करून यश मिळवावे यासाठी गावातून रॅली काढण्यात आली.रॅलीला गावातील युवक / युवती मुलाचा मोठया संख्येने सहभाग होता.त्यांना पुढील वाटचालीस जय मल्हार युवा सेना तथा कुरमार समाज बेंबाळ व नातेवाईक,चंद्रपूर - गडचिरोली जिल्ह्यातील येथील कुरमार समाजातील पदाधिकारी समाज बांधव शुभेच्छा दिले.