आरमोरी रस्त्यावरील किशोर वाकडे यांच्या पोल्ट्री फॉर्म मध्ये पाच कोंबड्या फस्त.
📍८ फुटाच्या अजगर सापास सर्प मैत्रिणी प्रवज्जा प्रलय सहारे आणि सर्पमित्र प्रलय सहारे यांनी पकडून जीवदान दिले.
एस.के.24 तास
आरमोरी : वैरागड (Python Snake) : येथील आरमोरी रस्त्यावरील किशोर वाकडे यांच्या पोल्ट्रीफॉर्म मध्ये घुसून पाच कोंबड्या फस्त करणार्या ८ फुटाच्या महाकाय अजगर सापास वैरागड येथील सर्प मैत्रिणीन प्रवज्जा प्रलय सहारे आणि सोबत सर्पमित्र प्रलय सहारे यांनी अलगत पकडून जीवदान दिले.
अजगर पाहताच अंगावर काटे उभे करणारा हा प्रसंग पोल्ट्रीफॉर्म मालक आणि ग्राहकांना धक्का देणारा ठरला. जगात महाकाय म्हणून समजला जात असलेला ८ फूट लांबीचा अजगर आढळल्यानंतर आरमोरी येथील वृक्षवल्ली वन्यजीव संरक्षण संस्थेचे सदस्य गडचिरोली जिल्ह्यातील एकमेव सर्पमैत्रीन प्रवज्जा प्रलय सहारे आणि (Python Snake) सर्पमित्र प्रलय सहारे यांनी त्याला अथक प्रयत्नाने पकडून जीवदान दिले.
अवकाळी पावसानंतर परिसरात विषारी, निमाविषरी आणि बिनविषारी सापाचा भक्ष शोधण्यासाठी घरात वावर वाढला आहे. आरमोरी रस्त्यावरील किशोर वाकडे यांच्या पोल्ट्रीफॉर्म मध्ये कोंबड्या ठेवलेल्या पिंजर्यामधे महाकाय साप असल्याची माहिती पोल्ट्रीफॉर्म मालक किशोर वाकडे यांनी भ्रमणध्वनीवरून सर्पमित्र यांना दिली.
(Python Snake) सर्पमित्रांनी तत्काळ त्याठिकाणी जाऊन पहिले असता पिंजर्यात कोंबड्या खाऊन सुस्त अवस्थेत असलेला अजगर साप आढळला. सापाची ओळख पटवून तेथील ग्राहकांना शांत करून समोरील अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्पमित्रांनी अजगर सापास अथक प्रयत्नाने अलगद पकडून पिशवीत बंद केले.
कधीच न पाहिलेला महाकाय अजगर साप पकडताच पोल्ट्रीफॉर्म मालक त्यांचा परिवार आणि ग्राहकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आणि सर्पमित्रांचे आभार मानले. (Python Snake) साप पकडताच सर्पमित्रांनी वैरागड वन विभाग कार्यालय आणि आरमोरी येथील वृक्षवल्ली वन्यजीव संरक्षण संस्थेला माहिती दिले.
वैरागड येथील युवा कार्यकर्ते रुचित बोधनकर,अंकित बोधनकर, नितीन बरडे, शुभम बोधनकर, नितीन मोहूर्ले, मोहित शिडाम, अभिमन्यू नव्हाते, यांच्या सहकार्याने आरमोरी रस्त्यावरील जंगल परिसरात सोडून दिले.