गडचिरोली मध्ये अवैध दारू विक्रीसाठी अल्पवयीन मुलांचा वापर ; सावली येथील महिलेला अटक. 📍महिला सराईत असून तिच्यावर दहा ते बारा गुन्हे नोंद आहेत.

गडचिरोली मध्ये अवैध दारू विक्रीसाठी अल्पवयीन मुलांचा वापर ; सावली येथील महिलेला अटक.


📍महिला सराईत असून तिच्यावर दहा ते बारा गुन्हे नोंद आहेत.


 एस.के.24 तास 


गडचिरोली : अवैध दारूची विक्री करण्यासाठी पोटच्या मुलासह इतर काही अल्पवयीन मुलांचा वापर केल्याचे १९ जून रोजी उजेडात आले. याबाबत १८ जून रोजी गडचिरोली ठाण्यात गुन्हा नोंदवून एका महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले.


पोलिसांच्या माहितीनुसार, ही महिला मूळची चंद्रपूर च्या सावली ची रहिवासी आहे. १७ जून रोजी रात्री आठ वाजता जिल्हा रुग्णालयासमोर चंद्रपूर रोड वरील फूटपाथवर दोन व्यक्तींमध्ये हाणामारी सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. 


पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी कर्मचाऱ्यांना रवाना केले. यावेळी पोलिसांना पाहून " दारू घेऊन पळून जा " असे महिलेने एका अल्पवयीन मुलाला सांगितले.त्यानंतर तो दारूची पिशवी घेऊन पळून गेला.


 तेथे जावेद खान (रा.गाेकुळनगर,गडचिरोली) याच्या हातात चाकू होता, तो संजय सडमेक (रा.सावली जि.चंद्रपूर) यास मारहाण करत होता. पोलिसांना पाहून जावेद खान जिल्हा परिषदेच्या दिशेने पळाला.पोलिसांनी पाठलाग करुन त्यास पकडले 


तर संजय सडमेक किरकोळ जखमी आढळला. त्यास जिल्हा रुग्णालयात उपचार केले. त्यानंतर दोघांनाही ठाण्यात आणले. हवालदार संजय पोल्लेलवार यांच्या फिर्यादीवरुन जावेद खान, संजय सडमेक यांच्याविरुध्द सार्वजनिक ठिकाणी मारहाण करुन शांतता भंग केल्याचा तर महिलेविरुध्द अल्पवयी मुलांकरवी दारूविक्री केल्याचा ठपका ठेऊन गुन्हा नोंदविण्यात आला.


त्या महिलेवर डझनभर गुन्हे : -

१७ जून रोजी रात्री ही महिला स्वत:हून पोलीस ठाण्यात आली. तिच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता अल्पवयीन मुलांचा दारूविक्रीसाठी वापर केल्याची कबुली तिने दिली. स्वत:च्या अल्पवयीन मुलासह इतर काही अल्पवयीन मुलांना हाताशी धरुन ती चंद्रपूर मार्गावर हातगाडा लावायची. तेथून ती दारूची विक्री करत असे. ती सराईत असून तिच्यावर दहा ते बारा गुन्हे नोंद आहेत.


न्यायालय, जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात विक्री : - 

हवालदार संजय पोल्लेलवार यांच्या फिर्यादीनुसार, सदरील महिला अल्पवयीन मुलांकरवी जिल्हा न्यायालय, जिल्हा रुग्णालय,जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषदेच्या परिसरातही दारूची विक्री करायची. कुरखेडा न्यायालय आवारात १८ जून रोजी एका वकिलाचा वाहनालक मद्यपान करताना आढळला.त्यानंतर अल्पवयीन मुलांचा दारूविक्रीसाठी वापर केल्याने दारूबंदीचे नागडे सत्यही समोर आले आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !