मारिया महाविद्यालय,मूल येथे रा.से.यो.विभागाच्या वत्तीने आंतरराष्ट्रीय योगा दिनाचे आयोजन.
एस.के.24 तास
मुल : मारिया महाविद्यालय,मुल येथे दि.३मे२०२५ ते २१जून२०२५ या कालावधीमध्ये "एक पृथ्वी एक आरोग्यासाठी योग" या संकल्पनेवर आधारित आंतरराष्ट्रीय योग दिन २०२५ च्या निमित्ताने राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने दि.३ मे २०२५ ला मारिया महाविद्यालय,मूल येथे
कार्यक्रमाचे उद्घाटन मारिया महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.भास्कर सुकारे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. या दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयामध्ये विविध उपक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमाचा समारोप दि.२१जून२०२५ ला घेण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान प्राचार्य डॉ.भास्कर सुकारे व जनुद्दीन जव्हेरी पॉलिटेक्निकचे प्राचार्य राहूल पुरम यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक योग प्रशिक्षक प्रा.रोशन तिवाडे यांनी सर्व उपस्थितांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून सर्व योगासनाचे महत्व पटवून दिले.तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.भास्कर सुकारे यांनी आपल्या मार्गदर्शनात मानवी जीवन जगत असताना या स्पर्धेचे युगात स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी योगासन किती महत्त्वाचे आहे ते आपल्या दैनंदिन जीवनात दररोज नियमित करणे काय गरजेचं आहे याबद्दल सखोल असं मार्गदर्शन करण्यात केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख प्रा.प्रफुल निरूडवार व आभार प्रा. गीतांजली मशाखेत्री यांनी मानलं या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी व सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.