शाळा प्रवेश उत्सव अ-हेरनवरगांव जिल्हा परिषद शाळेत नवप्रवेशित विद्यार्थ्यांचे मिरवणुकीने स्वागत.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक.
ब्रम्हपुरी : दिनांक,२३/०६/२५ ब्रम्हपुरी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अ-हेरनवरगांव येथील मुख्याध्यापक देवानंद तुलकाने, शाळा समिती अध्यक्ष, सदस्य गण तथा सर्व शिक्षक वृंद व गावातील प्रतिष्ठित नागरिक यांनी शाळेच्या पहिल्या दिवशी ट्रॅक्टर वरती नवप्रवेशित विद्यार्थी यांची बॅंडच्या तालावर जुन्या विद्यार्थ्यांच्या सुरात गावात मिरवणूक काढल्या.
नंतर विद्यालयाच्या पटांगणात मुख्याध्यापक तुलकाने,शाळा समिती अध्यक्ष संजय सहारे व उपस्थित सदस्य ,शिक्षक वृंद ,प्रतिष्ठित नागरिक यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करून शुभेच्छा दिल्या. सोबतच त्यांना पुस्तकाचे वाटप सुद्धा केले.
नवप्रवेशित विद्यार्थी व जुन्या विद्यार्थ्यांना फळे,मसालाभात व गोड पदार्थ यांचे वाटप करण्यात आले तेव्हा विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटलेले होते.