अ-हेरनवरगांव येथील स्मशानभूमीत भोले शंकराच्या व नंदीबैल,लिंड पिंड मूर्तीची प्रतिष्ठापना.

अ-हेरनवरगांव येथील स्मशानभूमीत भोले शंकराच्या व  नंदीबैल,लिंड पिंड मूर्तीची प्रतिष्ठापना.


अमरदीप लोखंडे - सहसंपादक


ब्रम्हपुरी : अ-हेरनवरगांव येथे बऱ्याच वर्षाच्या कालावधीनंतर मृत व्यक्तीला कैलास पती भोले शंकर यांचे दर्शन व्हावे या उदात्त हेतूने येथील स्मशानभूमीत शंकराची , नंदीबैल व लिंडपिंड या मुर्त्यांची प्रतिष्ठापना करण्यात आली.



हरिभक्त परायण रामकृष्ण चौधरी महाराज ब्रह्मपुरी सहकारी बाजीराव नहाले महाराज यांनी होम हवन करून मुर्त्यांची विधिवत पूजा केल्यानंतर सुरेशजीआडकिने ठेकेदार पिंपळगाव (भोसले), अमरदीप लोखंडे, दामिनी ताई चौधरी सरपंचा, जयश्री आडकिने, प्रतिभा खरकाटे, दिव्या राऊत, सुमन कुथे


सुषमा ठेंगरे, रागिनी कुथे यांनी शुभ्र वस्त्रात गुंडाळून असलेल्या भोल्या शंकराच्या मूर्तीची फीत कापून प्रतिष्ठापना व लोकार्पण केले. त्यानंतर भजन पूजनाने पंचामृत जलाभिषेकाने शुद्धीकरण करण्यात आले.


मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याप्रसंगी हनुमान देवस्थान सेवा समिती अध्यक्ष ब्रह्मदास सावजकर, सचिव प्रभु कुथे व सदस्य , जागेश्वर चौधरी, देवानंद राऊत व गावातील प्रतिष्ठित नागरिक व बहुसंख्य बालगोपाल, आबालवृद्ध ,माता - भगिनी व गावकरी  उपस्थित होते.स्मशानभूमीत प्रतिष्ठापित मूर्तीमुळे उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !