मुल येथील तरुण पत्रकार सामाजिक कार्यकर्ते अमित राऊत हे रान डुक्कराच्या हल्ल्यात गंभीर जखमी.
राजेंद्र वाढई - उपसंपादक एस.के.24 तास
मुल : मूल येथील तरुण पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते अमित राऊत हे रान डुक्कराच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले. ही घटना रविवारी रात्री (८ जून) रात्री ९ वाजता चिमढा गावाजवळ घडली.अमित त्यांचे वैयक्तिक काम पूर्ण करून मूलला परत येत असताना त्याचे दुचाकीसमोर अचानक रान डुक्कर आल्यांने, त्याचे धडकेत अमीत राऊत दुचाकीवरून खाली पडले. त्यात त्यांचे डोक्याला गंभीर जखम झाल्यांचे प्रत्यक्षदर्शीने सांगीतले.
प्रथमोपचारासाठी त्यांना मूल येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.नंतर त्यांची स्थिती गंभीर असल्याने त्यांना चंद्रपूर येथील डॉ.मेहरा हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले.डॉ.मेहरा यांचेकडे उपचार सुरू आहेत, परंतु अद्याप त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आलेली नाही.
या घटनेबाबत स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार मित्रांनी अमित राऊत यांच्या सुरक्षित व त्वरित बरे होण्यासाठी प्रार्थना करीत आहे.ग्रामीण भागात वन्य प्राण्यांचे हल्ले वाढत असल्याने या बाबतीत प्रशासनाने योग्य ते निराकरण केले पाहिजे,अशी मागणीही करण्यात आली आहे.