मजुरी ४७० रुपये,अन् वनअधिकार्‍याने दिले ३०० बोगस मजुरांकडून वनाधिकारी मालामाल. 📍लेंडेझरी वनपरिक्षेत्रधिकार्‍यांकडून मजुरांची आर्थिक लूट.

 


मजुरी ४७० रुपये,अन् वनअधिकार्‍याने दिले ३०० बोगस मजुरांकडून वनाधिकारी मालामाल.

📍लेंडेझरी वनपरिक्षेत्रधिकार्‍यांकडून मजुरांची आर्थिक लूट.


सुरेश कन्नमवार : मुख्य संपादक


भंडारा : (Landezari Forest Divisional) : पर्यावरणाचा समतोल राखण्याचे प्रभावी काम जंगलाच्या माध्यमातून होत असतो. त्यामुळे वनाचे सवर्धन व संरक्षणाची जवाबदारी वनविभागाच्या खाद्यांवर देण्यात आली आहे. यांच्या माध्यमातून खाजगी मजुराच्या हाताने जगंलातील विविध प्रकारचे कामे केली जात असतात व यासाठी वनविभागाने मजुराची मजुरीचे दरही निश्चित केले आहे.

 त्यानुसार मजुराना त्याच्या कामाचा मोबदला दिला जातो. त्यामुळेच वनाचे संरक्षण व सवर्धन होत असतो. मात्र वनामधे दिवसभर काम करूनही ठरलेली शासकीय मजुरी न देता अर्धीच मजुरी देवून मजुरांची आर्थिक लुट करण्याचा प्रकार (Landezari Forest Divisional) लेंडेझरी वनपरिक्षेत्रातील वन अधिकार्‍याकडून राजरोसपणे सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे.

तुमसर तालुक्यातील लेंडेझरी वनपरिक्षेत्रधिकारी (Landezari Forest Divisional) कार्यालयाच्या मार्फत विविध बिटमध्ये वन सवर्धनाचे काम मजुराच्या माध्यमातून सुरू आहेत. याकामावरील वनविभागाने मजुरीचे दर ४७० रुपये ऐवढे निश्चित केले आहे. मात्र मजुरांना यापेक्षा कमी मजुरी देवून आर्थिक बोळवन केली जात असल्याने मजुरामध्ये संताप व्यक्त केले आहे.

लेंडेझरी वनपरिक्षेत्रा (Landezari Forest Divisional) अंतर्गत येणार्‍या सहवनक्षेत्र चिखली येथील कुप क्र.५९ मधिल कम्पार्मेन्ट क्रमांक १६ मध्ये सिबिओ व इतर विविध कामे मजुरामार्फत करण्यात आले. कामावर असलेल्या मजुरांचे व काही बोगस मजुरांचे नावे टाकून मस्टर वरिष्ठांना दाखल करण्यात आले. त्यानंतर सदर कामाचे पेमेंट लागल्यानंतर खरे मजुराना धक्काच लागला. 

मजुरी दर ४७० रुपये असताना ३०० रुपये कसे असा प्रश्न पडला. याबाबत माहिती विचारल्यावर वनविभागाकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याने खरे मजुर कंगाल तर वनअधिकार्‍याच्या आशिर्वादाने बोगस मजुर मात्र मालामाल होत असल्याचे दबक्या आवाजात बोलले जात आहेत. त्यामुळे पाणी कुठे मुरते याची चौकशी वरिष्ठ वनअधिकार्‍यानी करुन मजुरांना न्याय देण्याची मागणी केली आहे.

बोगस मजुराबाबद माहिती घेवून दोषींवर कार्यवाही करु व नियमापेक्षा कमी मजुरी मिळाली असल्यास त्याची चौकशी करून मजुरांना पूर्ण मजुरी देण्यात येईल. सदर प्रकरणाची परिपूर्ण चौकशी झाल्यानंतरच उर्वरित पेमेंट अदा करण्यात येतील.
- रोहीत भोंगाडे,सहाय्यक वनसरक्षक भंडारा

वनविभागाच्या कम्पार्मेन्ट क्र.१६ मध्ये वनविभागाच्या विविध कामावर एकूण ३५ दिवस कामावर गेलो असुन त्याकामाच्या मजुरीचे १०८१० रु पेमेंट माझ्या खात्यावर जमा झाले, पण याची बेरीज केल्यास वनविभागाच्या नियमानुसार देय असलेल्या ४७० रूपयापेक्षा कमी आहे म्हणजेच बाकी पैसे गेले कुठे ? हा माझ्यावरील अन्याय आहे, याची चौकशी व्हावी.
- कामावरील एक मजूर

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !