पवनी ते सावरला,तोरगाव,नान्होरी,नांदगाव, पिंपळगाव (भोसले ) सुरबोडी मार्गे वडसा पर्यंत नवीन बस सेवा सुरू करावी जनतेची मागणी.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : दिनांक,२२/०७/२५ भंडारा,चंद्रपूर,आणि गडचिरोली जिल्ह्यातील प्रवाशांना कोणतेही शासकीय कामे , लग्नकार्य, वस्तूंची खरेदी - विक्री,वस्तूंची ने-आण , शालेय, महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी प्रवासी व विद्यार्थ्यांना कमी अंतराने प्रवास करणे सोयीचे व्हावे म्हणून पवनी ते वडसा पर्यंत नवीन एस.टी. बस सेवा ब्रह्मपुरी (गडचिरोली) आगाराने सुरू करावी अशी परिसरातील जनतेची मागणी आहे.
पवनी ते वडसा एस.टी. बस सेवा ही पवनी, सावरला, तोरगांव, नान्होरी ,नांदगाव(जाणि),अ-हेरनवरगांव ,पिंपळगांव (भोसले) ,सुरबोडी,वडसा या मार्गे सुरू करावी.सदर बस सेवा सुरू झाल्यास कमीत कमी अंतराने प्रवासी व शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी यांना ये -जा करण्या करिता सोयीचे होईल. तसेच तिन्ही जिल्ह्यांशी जवळीक निर्माण होऊन नवीन संबंध व व्यापारी व्यवसायासाठी प्रोत्साहन मिळेल.