जन सुरक्षा कायदा रद्द करा. - वंचित बहुजन आघाडी चे मुख्यमंञ्यांसह राज्यपालांना निवेदन.
एस.के.24 तास
देसाईगंज (वडसा) : नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात महायुती सरकार ने जनसुरक्षा विधेयक पारित केले . हे विधेयक जनसुरक्षे च्या नावाखाली जनतेचे हक्क हिसकावुन घेणारे असल्याने वंचित बहुजन आघाडी चे प्रणेते अँड बाळासाहेब आंबेडकरांनी प्रखर विरोध दर्शविला.
असुन संपुर्ण महाराष्ट्रात या विधेयकाच्या विरोधात एलगार पुकारला असल्याने त्याच धर्तिवर देसाईगंज तालुक्यातिल वंचित बहुजन आघाडी ने आज देसाईगंज च्या उपविभागिय अधिकारी कार्यालयाच्या मार्फतिने महाराष्ट्राचे राज्यपाल तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंञी यांना सदरचे विधेयक रद्द करण्याच्या मागणिचे निवेदन सादर केले.
काय आहे जनसुरक्षा विधेयकाच्या तरतुदी महाराष्ट्र विधिमंडळाने पारित केलेले जनसुरक्षा विधेयकाच्या तरतुदित प्रतिबंधित संघटनांच्या माध्यमातुन मोर्चे , निदर्शने आंदोलने उभारण्यास बंदी , शासनाच्या विरोधात वक्तव्य करण्यावर बंदी , शासकिय धोरणांच्या विरोधात मोर्चे काढणे ,आंदोलन उभारण्यावर बंदी अश्या जाचक तरतुदींचा समावेश केल्याने नागरिक , विद्यार्थी , पेन्शन धारक सरकार च्या विरोधात निदर्शने देऊ शकत नाही.
असे आढळल्यास त्यांचेवर शहरी नक्षलवाद,मोका,ताडा अश्या गुन्ह्याची नोंद करण्याची तरतुद असल्याने संविधानाने बहाल केलेल्या नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंञ्य हिरावुन घेण्याची दाट शक्यता असल्याने सदर विधेयक रद्द करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडी चे जिल्हा महासचिव राजरतन मेश्राम यांनी देसाईगंज च्या प्रभारी उपविभागिय अधिकारी तथा तहसिलदार प्रिती दुडुलकर यांच्या मार्फतिने महाराष्ट्राचे राज्यपाल तथा महाराष्ट्राचे मुख्यमंञी यांना सादर केलेल्या निवेदनात नमुद केले.
या प्रसंगी वंचित चे जिल्हा उपाध्यक्ष प्रा.भिमराव शेन्डे,महिला आघाडी जिल्हाध्यक्षा प्रज्ञा निमगडे , तालुका अध्यक्ष विनोद मेश्राम , शहर अध्यक्ष प्रा अशोक मेश्राम , तालुका उपाध्यक्ष शिशुपाल वालदे,सचिव राकेश शेन्डे नानाजी कर्हाडे,अभिमन्यू बन्सोड प्रमोद मेश्राम,दिलिप बन्सोड,संजय ठवरे उद्धवराव खोब्रागडे ,मनोज घायवान
हुपचंद भैसारे लक्षमनजी नागदेवते प्रमोद नांदगावे सविता भैसारे निमा बागडे ज्योती दहिकर कविता निरंजने पोर्णिमा गणविर लता बारसागडे राजेन्द्र बारसागडे रोहित जनबंधू पप्पु खान दिवाकर बारसागडे प्रकाश बारसागडे भाष्कर मेश्राम यांचेसह वंचित बहुजन आघाडी चे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.