कवी : - खेमदेव कन्नमवार यांच्या लेखणीतून...
मोठ्यानं बोंबलून सांगतो,भाऊ मी हो झाडीचा.
एस.के.24 तास
नाई केलू लोब कदी गाडी बंगला माडीचा
मोठ्यानं बोंबलून सांगतो,भाऊ मी हो झाडीचा.
महाराष्ट्राच्या पूर्वेकड आहेत आमचे जिल्हे
गोंड राज्यांचे आहेत लगित वगीत किल्ले
भया जंगल आहे दुष्काड नाही काडीचा
मोठ्यानं बोंबलून सांगतो,भाऊ मी हो झाडीचा.
पांढऱ्या पांढऱ्या भातावर लाकोरीच वरन
भाय आवडीन खातुन आमी भेंडीचा आरन
सर नाही ये पनीरले मासऱ्याच्या कढीचा
मोठ्यानं बोंबलून सांगतो,भाऊ मी हो झाडीचा.
तोंडार आहेत पण चांगले आहेत लोकं
मोठ्यानं झगडतेत पण फोडत नाही डोकं
मान ठेवतात पिकल्या केसाचा अन दाढीचा
मोठ्यानं बोंबलून सांगतो,भाऊ मी हो झाडीचा.
पेरमान बोलल त इस्वास लवकर करतेत
दिलेला सबद पुरा कराले जिवान मरतेत
जिकाले खेळत नाही कधी डाव रडीचा
मोठ्यानं बोंबलून सांगतो,भाऊ मी हो झाडीचा.
नाटक दंडारीचा आमाले मोठा शौक
खडी गंमत रायली त लहान पडते चौक
बैलाचा पट भरते गावोगावी होडीचा
मोठ्यानं बोंबलून सांगतो,भाऊ मी हो झाडीचा.
किती गुणगान गाऊ मी माझ्या झाडीचा
दिसत नाही कोणी दूर दूर याच्या तोडीचा
साप्पायले घेऊन चालतून बैल जसा मेडीचा
मोठ्यानं बोंबलून सांगतो,भाऊ मी हो झाडीचा.
कवी : - खेमदेव कन्नमवार ऊर्जानगर,चंद्रपूर मो.नं.94217 24363