विकास विद्यालय,अ-हेरनवरगांव येथे इयत्ता ५ वी च्या नव प्रवेशित विद्यार्थ्यांना गणवेश वितरण.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : दिनांक,१५/०७/२५ ब्रह्मपुरी तालुक्यातील अ-हेरनवरगांव येथील विकास एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित विकास विद्यालय, अ-हेरनवरगांव येथील मुख्याध्यापक मंगल धोटे, शिक्षक, शिक्षिका यांच्या हस्ते नवप्रवेशित वर्ग ०५ वि च्या विद्यार्थ्यांना गणवेश वितरित करण्यात आले.गणवेश घेताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले होते.
या कार्यक्रमाप्रसंगी विद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी, गावातील प्रतिष्ठित नागरिक, शाळा व्यवस्थापन समिती सभासद व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.