राजुरा - गडचांदूर मार्गावरील कापनगाव जवळ हायवा ट्रक ने प्रवाशी ऑटोला चिरडले 6 जण ठार 2 गंभीर जखमी.
📍राजुरा तालुक्यातील पाचगाव या एकाच गावातील पाच जण ठार झाल्याने पाचगावात शोककळा पसरली आहे.
एस.के.24 तास
राजुरा : चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा - गडचांदूर मार्गावरील कापनगाव जवळ एका हायवा ट्रक क्रमांक.RJ.14 ग्क 9221ने प्रवाशी घेऊन जात असलेल्या ऑटो (क्रमांक MH.34 3941 ला समोरासमोर धडक दिल्याने झालेल्या भिषण अपघातात ऑटोचालकासह 6 जण ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज गुरूवार दि.28 ऑगस्ट ला दुपारी 4:00 वा.च्या सुमारास घडली.
मृतकांमध्ये रवींद्र हरी बोबडे वय,48 वर्ष,तनु सुभाष पिंपळकर वय,18 वर्ष, ताराबाई नानाजी पापुलवार वय,60 वर्ष,ऑटो चालक प्रकाश मेश्राम वय,50 वर्ष सर्व राहणार पाचगाव तर शंकर कारू पिपरे,वय, 50 वर्ष, रा.कोची,वर्षा बंडू मांदळे,वय,41 वर्ष रा.खामोना,यांचा समावेश आहे.
जखमी मध्ये निर्मला रावजी झाडे वय,50 वर्ष,रा. पाचगाव,भोजराज महादेव कोडापे वय,40 वर्ष रा. भुुरकुंडा यांचा समोवश आहे.जखमींना चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.
प्राप्त माहितीनुसार,राजुरा येथुन प्रवाशी ऑटोने 7 प्रवाशी व एक चालक असे 8 जण पाचगावकडे जात होते. राजुरा शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर महामार्गाचे काम सुरू आहे. आज एकाएकी येथे काम करण्यासाठी रस्ता वाहतुकीत बदल करण्यात आला. मात्र याविषयी मार्गावर कसलेही फलक लावले नव्हते.
विरुद्ध दिशेने भरधाव वेगात येत असलेल्या हायवा ट्रकने प्रवाशी ऑटोला भिषण धडक दिली.ही धडक एवढी भिषण होती की संपुर्ण ऑटोचा चुराडा झाला.
यावेळी तिन प्रवाशी जागीच ठार झाले तर एक जण राजुरा येथे उपचारादरम्यान मरण पावला व तिन जखमींना चंद्रपूर जिल्हा रूग्णालयात नेत असतांना वाटेत दोघांचा मृत्यू झाला.
या अपघातात बचावलेल्या एका प्रवाश्यावर चंद्रपूर जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार सुरू आहेत.या अपघाताची माहिती मिळताच राजुरा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून सर्व जखमींना रुग्णालयात दाखल केले आणि ट्रक चालकावर गुन्हा दाखल केला असून ट्रक चालक अद्याप फरार आहे.पोलिसांनी हायवा ट्रक ताब्यात घेतला आहे.
या अपघाताने राजुरा तालुक्यातील पाचगाव या एकाच गावातील पाच जण ठार झाल्याने पाचगावात शोककळा पसरली आहे.