आशा स्वसंसेविका पद भरती रद्द करुन पारदर्शी प्रक्रिया राबवा. - वंचित बहुजन आघाडी चे निवेदन सादर.

आशा स्वसंसेविका पद भरती रद्द करुन पारदर्शी प्रक्रिया राबवा. - वंचित बहुजन आघाडी चे निवेदन सादर.


एस.के.24 तास


 देसाईगंज (वडसा) : देसाईगंज तालुक्यातील कुरुड प्राथमिक आरोग्य केन्द्राअंतर्गत करण्यात आलेल्या आशास्वयंसेविका पदभरतीत भ्रष्टाचार झाला असुन निवड समिती ने नियम धाब्यावर बसवुन पाञ विधवा महिलेला डावलले.


याविषयी योग्य चौकशी करुन भरती प्रक्रिया रद्द करुन पारदर्शी पद्धतीने निवड प्रक्रिया राबवावी अशी मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंञी तथा गडचिरोली जिल्हा पालकमंञी ,आरोग्य मंञी महाराष्ट्र जिल्हा मुख्य कार्यपालन अधिकारी जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच तहसिलदार देसाईगंज यांना निवेदनाच्या माध्यमातुन करण्यात आली .                   


कुरुड येथिल रहिवासी असलेल्या कल्याणी महेश वासनिक या विधवा महिलेसह ६३ महिलांनी आशा वर्कर च्या २ पदांसाठी आपले आवेदन पञ तालुका वैद्यकिय अधिकारी देसाईगंज यांचेकडे सादर केले होते. उच्चशिक्षित असलेल्या कल्याणी वासनिक यांना निवड समिती सचिव डॉ.पञूजी सडमाके यांनी २० हजार रुपयाची मागणी केली. 

माञ पैसे न दिल्याने सदर महिलेला मौखिक परिक्षेत कमी गुण देऊन भरती प्रक्रियेतुन बाद करण्यात आले.हा सुशिक्षित विधवा महिलेवर अन्याय असुन या प्रकरणाची सखोल चौकशी करुन सदर भरती प्रक्रिया पारदर्शी पद्धतीने पार पाडण्यासाठी दुसर्यांदा निवड प्रक्रिया राबवुन व्हिडीओ कॉन्फ्रंसी रेकॉर्डींग करण्यात यावे अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातुन करण्यात आली. 

देसाईगंज च्या तहसिलदार प्रिती दुडुलकर यांना निवेदन सादर करतांना कल्याणी वासनिक यांचेसह वंचित बहुजन आघाडी चे जिल्हा महासचिव राजरतन मेश्राम,जिल्हा उपाध्यक्ष प्रा भीमराव शेन्डे,

महिला आघाडी जिल्हाध्यक्ष प्रज्ञा निमगडे, देसाईगंज तालुका अध्यक्ष विनोद मेश्राम शहर अध्यक्ष प्रा अशोक मेश्राम दिलिप बन्सोड इंजि प्रमोद मेश्राम कुंदा झाडे भारती मेश्राम कुमता मेश्राम ज्योती दहिकर रविना मेश्राम प्राजक्ता मेश्राम अक्षता ठवरे प्रिया घोडेस्वार विजय मेश्राम प्रियंका बोरकर मनिषा गणविर यांचेसह कुरुड चे ग्रामस्थ उपस्थित होते .

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !