गडचिरोली येथे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे व अ‍ॅड.विश्वजित कोवासे यांचा भव्य सत्कार.


गडचिरोली येथे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे व अ‍ॅड.विश्वजित कोवासे यांचा भव्य सत्कार.


एस.के.24 तास


गडचिरोली  जिल्हा युवक काँग्रेसने केलेल्या सत्कारामुळे मी भारावून गेलो असून पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या या शुभेच्छा मला काम करण्यास प्रेरणा देतील व युवकांचे संघटन मजबूत करून काँग्रेसला पुन्हा उभारी देण्याचे कार्य करण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहीन असे प्रतिपादन युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांनी केले.


महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे व अखिल भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव तथा महाराष्ट्र काँग्रेसचे सचिव अ‍ॅड.विश्वजित मारोतराव कोवासे यांचा सत्कार समारंभ ३ ऑगस्ट रोजी चामोर्शी मार्गावरील  सेलिबे्रशन फंक्शन हॉलच्या सभागृहात आयोजित केला होता.यावेळी सत्कारास उत्तर देतांना ते बोलत होते. 


यावेळी प्रमुख अतिथी म्हणुन खा.डॉ.नामदेव किरसान,आ.रामदास मसराम, माजी खा.मारोतराव कोवासे,जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे,जि.प.चे माजी उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेटी,महिला जिल्हाध्यक्षा अ‍ॅड.कविता मोहरकर,


ज्येष्ठ नेते माजी जिल्हा अध्यक्ष,प्रकाश इटनकर,चंद्रपूर जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष शंतनु धोटे,महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव अतुल मल्लेलवार, प्रतीक बारसिंगे,शहर अध्यक्ष विवेक घोंगडे,अभिजित धाईत आदी मान्यवर उपस्थित होते.

शाल,श्रीफळ व डायरी,पुष्पगुच्छ देवून सत्कार : -

गडचिरोली युवक काँग्रेसचे अध्यक्ष नितेश राठोड व पदाधिकार्‍यांनी नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे तथा नवनियुक्त युवक काँग्रेस सचिव तथा महाराष्ट्र काँग्रेसचे सचिव अ‍ॅड.विश्वजित कोवासे यांचा शाल, श्रीफळ व डायरी,पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. 


खा.डॉ.नामदेव किरसान यांनी प्रदेश काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदी शिवराज मोरे व अखील भारतीय युवक काँग्रेसच्या सचिवपदी नियुक्ती झालेल्या विश्वजित कोवासे यांना शुभेच्छा देत काँग्रेसच्या संघटनात्मक बांधणीसाठी सक्षमपणे काम करावे अशा अपेक्षा व्यक्त केल्या.

उपस्थित काँग्रेस पदाधिकारी यांना मार्गदर्शन केले. तसेच आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आ.रामदास मसराम व जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनीसुद्धा उपस्थितांना मार्गदर्शन केले.    

या सत्कार कार्यक्रमाला जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते यांची मोठया संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितेश राठोड यांनी तर संचालन करून आभार चंचल रोहणकर यांनी मानले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !