जिल्ह्यात 15 दिवस जमावबंदी लागू.

जिल्ह्यात 15 दिवस जमावबंदी लागू.


एस.के.24 तास


गडचिरोली : दि. 29 सप्टेंबर 2025 नवरात्र, विजयादशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर तसेच माओवादी संघटनांकडून हिंसक कारवायांची शक्यता लक्षात घेऊन जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये गडचिरोली जिल्ह्यात 15 दिवस जमावबंदी आदेश लागू केला आहे.


हा आदेश 23 सप्टेंबर 2025 रोजी 00.01 वा. पासून 07 ऑक्टोबर 2025 रोजी 24.00 वा. पर्यंत संपूर्ण जिल्ह्यात लागू राहील. या काळात शस्त्रास्त्रे, स्फोटके बाळगण्यास मनाई असून पूर्वपरवानगीशिवाय मिरवणुका, सभा, मोर्चे व पाचपेक्षा अधिक व्यक्तींच्या जमाव यावर मनाई करण्यात आली आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !