प्रहार दिव्यांग संघटना पुलगाव शहर अध्यक्ष संतोष मारोतराव नंदेश्वर आणि कार्यकर्ते टीम दिव्यांग शेतकऱ्यांच्या कार्यक्रमात बच्चुभाऊ कडू यांचे मनोहरी स्वागत.
एस.के.24 तास
वर्धा : वर्धा जिल्ह्यात दिव्यांग शेतकरी शेतमजूर अनाथ मेंढपाळ विधवा यांच्या न्यायासाठी गुरुवार दिनांक, 11/9/2025 रोजी हक यात्रेच्या निमित्ताने वर्धा जिल्ह्यात देवळी येथे बच्चु भाऊ कडू आले होते.दुपारी 12:00. वाजता देवळी येथे दिव्यांग व शेतकरी मेळावा आयोजित केला होता.
त्यानिमित्ताने देवळी येथील कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक तथा माजी मंत्री अपंग हृदय सम्राट बच्चुभाऊ कडू.किरण ठाकरे अध्यक्ष युवा संघर्ष मोर्चा. कार्यक्रमाचे अध्यक्ष मोहन बाबू अग्रवाल यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह देवळी येथे 11 सप्टेंबर रोजी दिव्यांग व शेतकऱ्यांच्या हितासाठी मोठा सामाजिक मेळावा पार पडला.
या कार्यक्रमात प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलनाचा उल्लेख होता तसेच विविध सामाजिक राजकीय संघटना उपस्थित होत्या या कार्यक्रमात पुलगाव शहर प्रहार दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष माननीय संतोष मारोतराव नंदेश्वर. व पुलगाव चे सर्व कार्यकर्ता तर्फे माननीय बच्चुभाऊ कडू यांचा भव्य सत्कार करण्यात आला.
पुलगाव शहर टीम पुलगाव शहर अध्यक्ष संतोष नंदेश्वर धम्मा कारमोरे पुंडलिक तायडे तनवीर खान प्रवीण देवगडे शंकर लट्टे रहीम खान.खुशाल बैस.दीपक सवाई.गाजरे काकू दादाराव वाघमारे या टीमने समाजसेवक बच्चुभाऊ कडू यांचे मनःपूर्वक स्वागत करून या कार्यक्रमाला विशेष यश मिळून दिले.या सामाजिक उपक्रमा सक्रिय सहभाग घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.