मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान च्या अनुषंगाने रोजी तालुका स्तरीय कार्यशाळे चे आयोजन सहकार मंगल कार्यालय आर्वी येथे पंचायत समिती आर्वी तर्फे संपन्न.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान च्या अनुषंगाने रोजी तालुका स्तरीय कार्यशाळे चे आयोजन सहकार मंगल कार्यालय आर्वी येथे पंचायत समिती आर्वी तर्फे संपन्न.


एस.के.24 तास


वर्धा : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान च्या अनुषंगाने दिनांक 12/09/2025 रोजी तालुका स्तरीय कार्यशाळे चे आयोजन सहकार मंगल कार्यालय आर्वी येथे पंचायत समिती आर्वी तर्फे करण्यात आले.कार्यक्रमाचे उदघाटन मा. दादारावजी केचे, आमदार विधान परिषद, महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते झाले.



प्रास्ताविक मा गटविकास अधिकारी सुनिताताई मरस्कोल्हे मॅडम यांनी केले.तसेच मा गवीअ यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या 

1) सुशासन युक्त पंचायत (लोकािभमुख सक्षम पंचायत शासन) (Good Governance )तयार करणे 

2) सक्षम पंचायत (स्वनीधी,CSR व लोकवर्गणीतून पंचायत राज संस्थाना आर्थिक सक्षम करणे) 

3) जल समृद्ध व हरीत गाव निर्माण करणे 

4)मनरेगा व इतर योजनांचे अभीसरण करणे.

5) गावपातळीवरील संस्था सक्षमीकरण करणे 

6) उपिजिविका विकास,सामाजिक न्याय 

7) लोकसहभाग व श्रमदान  माध्यमातून लोकचळवळ निर्माण करणे या सात मुख्य घटक विषयाचे सविस्तर मार्गदर्शन केले. 


उदघाटनीय भाषणात अभियान यशस्वीपने राबवून जास्तीत जास्त बक्षिसे मिळविण्याचे आवाहन मा आमदार महोदय यांनी केले.सूत्रसंचालन श्री बुरघाटे सर आणि श्रीमती राजणेकर म्याडम यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री देवकर सर यांनी केले.


सदर कार्यशाळे मध्ये सरपंच तसेच ग्रामपंचायत अधिकारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.सदर कार्यशाळेला पंचायत समितीचे सर्व विस्तार अधिकारी व कर्मचारी तसेच तालुक्यातील सर्व सरपंच, उपसरपंच, सदस्य,केंद्रचालक,सि.आर.पि,तसेच ग्रामपंचायत अधिकारी हजर होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !