कोण आहेत हे आमदार घरात जाऊन नागरिकांची समस्या विचारणारे पहिले आमदार ? 📍" आमदार आपल्या दारी " हा विशेष उपक्रम राबवला जात आहे.

कोण आहेत हे आमदार घरात जाऊन नागरिकांची समस्या विचारणारे पहिले आमदार ?  


📍" आमदार आपल्या दारी " हा विशेष उपक्रम राबवला जात आहे.


एस.के.24 तास


वर्धा : अनेकदा नागरिक आपल्या समस्या घेऊन संबंधित अधिकारी किंवा लोक प्रतिनिधींकडे जात असतात. त्यांना प्रतिसाद न मिळाल्याने नागरिक हतबल होतात.एकेकाळी आपल्याकडे मत मागण्यासाठी आलेले लोकप्रतिनिधी 5 वर्षे आपल्याकडे पाठ फिरवतात,त्यामुळे मत देऊन आपण चूक केली की काय अशी भावना मतदाराच्या मनात निर्माण होते.


वर्ध्यात याच्या उलट घडतंय.वर्धा जिल्ह्यात 4 विधानसभा मतदार संघापैकी आर्वी मतदारसंघात चक्क आमदारच नागरिकांच्या घरोघरी जात तुम्हाला काही समस्या आहे का..? कुठली शासकीय कामे प्रलंबित आहेत का..? शेतजमीन समस्या,रस्ते,नाले आणि इतर समस्या असेल तर त्याची नोंद एका रजिस्टर मध्ये केली आहे.


या शिवाय 9 ऑक्टोबर ला ठरलेल्या ठिकाणी येण्याची विनंती ही करण्यात येत आहे.आर्वी मतदारसंघ हा मोठा असल्याने प्रत्येक घरी आमदार स्वतः जाऊ शकत नसल्याने प्रत्येक गावागावात आमदारांनी आपल्या कार्यकर्त्यांना प्रत्येक नागरिकांच्या घरोघरी जात अगदी डोअर टू डोअर जाऊन नागरिकांना समस्या विचारून त्याच्या नावापुढे लिहिल्या जात आहे.


वर्धा जिल्ह्यात पहिल्यांदाच आमदार आपल्या दारी हा विशेष उपक्रम आमदार सुमीत वानखेडे यांच्या संकल्पनेतुन राबविण्यात येत आहे.या उपक्रमात सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी एकाच छताखाली आमदारांच्या समवेत उपस्थित राहणार असून नागरिकांनी सांगितलेल्या समस्या तात्काळ सोडविण्यात येणार आहे.


यासाठी 9 ऑक्टोबर ही तारीख निश्चित करण्यात आली असून या आगळ्यावेगळ्या उपक्रमामुळे आपले मत वाया गेले नाही अशी भावना तुर्तास तरी नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !