सावली तालुक्यातील पेडगाव माल शेतात फवारणी करत असताना सर्पदंश झाल्याने 40 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू.
एस.के.24 तास
सावली : सावली तालुक्यातील पेडगाव माल येथील भाऊजी चिरकुटा भोयर वय,40 वर्ष या तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.ही घटना आज सकाळी शेतात घडली.मृत भाऊजी चिरकुटा भोयर या आपल्या शेतात काम करत असताना अचानक काही तरी चावा घेतल्याचा लक्षात येताच त्यांनी गावात आले.
सावली ग्रामीण रुग्णालय येथे नेले असता त्याला ग्रामीण रुग्णालय, सावली येथील वैद्यकीय अधिकारी यांनी पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालय गडचिरोली येथे पाठविण्यात आले परंतु काही तासा नंतर.जिल्हा रुग्णालय गडचिरोली येथे मृत्यू झाला.मृत भाऊजी यांचा मागे पत्नी व दोन मुले आहेत घरातील कर्ता पुरुष गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
मृत भाऊजी भोयर यांच्या मागे पत्नी व दोन मुले असून, अचानक झालेल्या या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.स्थानिक प्रशासन कडून पंचनामा करून ,आपत्ती व्यवस्थापनाच्या माध्यमातून मदत देण्यात यावी. - उमेश गोलेपल्लीवार शिवसेना तालुका अध्यक्ष सावली