सावली तालुक्यातील मोखाळा येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा.

सावली तालुक्यातील मोखाळा येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा.


एस.के.24 तास


सावली : मोखाळा ता. सावली,जि. चंद्रपूर येथे सम्राट अशोक विजया दशमी आणि ६९ वां धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त अनुसूचित जातीतील क्रमांक 35 मधील समाजबांधवांच्या/भगिनीच्या पुढाकाराने एक भव्य व अनुशासित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमासाठी समता संघर्ष समाज परिवर्तन संघटनेच्या कार्यकर्त्यांना विशेष पाचारण करण्यात आले होते.


सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण मोहुर्ले यांनी तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष विजयभाऊ देवतळे उपस्थित होते. मंचावर कालिदास लाटेलवार,संदीप येनगंटीवार, मुक्तेश्र्वर नल्लूरवार,शामराव गोरडवार व अन्य मान्यवरांची उपस्थिती लाभली.


लक्ष्मण मोहुर्ले सामाजिक कार्यकर्ते यांनी तसेच विजयभाऊ देवतळे यांच्या मार्गदर्शनातून अनुसूचित जातीमध्ये आपली जात 35 व्या क्रमांकावर असून सुद्धा आपले शैक्षणिक सामाजिक आर्थिक आणि राजकीय विकास साधता आला नाही.


भारत स्वतंत्र्य होऊन 75 वर्षाच्या अधिक काळ लोटला परंतु समाज पाहिजे त्या प्रमाणात विकास पासून ओसो दूर मागे राहिलेला आहे.37 क्रमांकाच्या समाजाने तसेच इतर समाजाने कशी प्रगती केली त्यांचे पाहून आपण कृती केली पाहिजे तरच आपल्या समाजाचा विकास होईल.


आजच्या विज्ञान वादी युगात आपल्या समाजातील सुशिक्षित युवक युवतींनी विश्वास मध्ये किंव्हा अंधश्रद्धेत गुरफळुन न राहता विज्ञानवादी शिक्षण घेऊन आपली व आपल्या समाजाची प्रगती शक्य आहे विश्वरत्न, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले उपदेश शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा उपदेश अवलंब करा. तरच आपल्या समाजाची प्रगती होईल असा उपदेश समाज बांधवांना करण्यात आला.


तसेच उपस्तिताना मान्यवरांच्या हस्ते भारतीय संविधान देऊन संविधान वाचन करून शासन करती जमात बना असा उपदेश समाज बांधवांना भगिनींना मार्गदर्शनपर करण्यात आले धम्म, समता आणि परिवर्तनाच्या वाटचालीचा संदेश देण्यात आला. 


समाजातील एकतेचा, बंधुत्वाचा आणि प्रबोधनाचा संदेश पोहोचविण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे विशेष कौतुक करण्यात आले.


कार्यक्रमात मनोहर गोरडवार, योगेश लाटेलवार, सुशील नल्लूरवार, मुकेश गोरडवार, दिनेश लाटेलवार, विजय लाटेलवार, शंकर येलमुलवार, विनोद गोरडवार, अनिल गोरडवार, कचरू आडुरवार, पुरूषोत्तम आडुरवार, बाबुराव लाटेलवार, अन्नदराराव गोरडवार


गंगाराम आडुरवार, जनार्दन गोरडवार, मुकुंदा गोरडवार, रमेश लाटेलवार, रामदास गोरडवार, सत्यम आडुरवार, आदिनाथ आडुरवार, सूरज येलमुलवार, वर्षा आडुरवार, दर्शना येलमुलवार, मिनाक्षी देवतळे, बेबीनंदा लाटेलवार, पापिता मोहुर्ले, वनिता आडुरवार, पत्राबाई नल्लूरवार आदी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन स्थानिक बांधवांनी शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडले.प्रास्ताविक सुनील नल्लूरवार यांनी केले, सूत्रसंचालन कृष्णा लाटेलवार यांनी तर आभार प्रदर्शन सतीश मोहुर्ले यांनी केले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !