वंचित बहुजन आघाडी पूर्व विदर्भ संयोजक समितीचा गडचिरोली दौरा संपन्न.
एस.के.24 तास
गडचिरोली : वंचित बहुजन आघाडी पूर्व विदर्भ संयोजक समितीचा संवाद दौरा कार्यक्रम दिनांक,04/10/2025 ला दुपारी 2:00.वाजता पत्रकार भवन गडचिरोली येथे पूर्व विदर्भ संयोजक समितीचे अध्यक्ष मा. भगवान भाऊ भोंडे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली व पूर्व विदर्भ संयोजक समितीचे संयोजक विवेकजी हाडके
अरविंद भाऊ सांदेकर,प्रशांत जी नगरकर, प्रा.हितेश जी मडावी,बाळू भाऊ टेंभुर्णे व गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रा.प्रशांत देव्हारे,जिल्हा महासचिव मंगलदास जी चापले, जिल्हा उपाध्यक्ष रघुनाथ जी दुधे,जिल्हा सदस्य अशोक जी कराडे,महिला जिल्हाध्यक्ष प्रज्ञा निमगडे, युवा अध्यक्ष सोनलदीप देवतळे, तसेच गडचिरोली जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे उपस्थित पार पडला.
या संवाद दौरा कार्यक्रमात वरिष्ठ पदाधिकारी यांनी संघटनात्मक कामावर भर देण्यात यावे. गाव पातळीवर जाऊन आपला पक्ष मोठा करण्याकरिता आपण संपूर्ण पदाधिकारी व कार्यकर्ते काम केले पाहिजे.
आगामी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका मध्ये वंचित बहुजन आघाडीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आले पाहिजे. या साठी आपण पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरले पाहिजे.असे अनेक मोलाचे संदेश वरिष्ठ पदाधिकारी यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे संचालन प्रज्ञा निमगडे महिला जिल्हाध्यक्ष यांनी केले.प्रास्ताविक व आभार प्रदर्शन जिल्हाध्यक्ष प्रा.प्रशांत देव्हारे यांनी केले.