येरकड येथे उपक्षेत्रात वन्यजीव सप्ताह साजरा.

येरकड येथे उपक्षेत्रात वन्यजीव सप्ताह साजरा.


एस.के.24 तास


धानोरा : संयुक्त वन वनव्यवस्थापन समिती जपतलाई  दिनांक,4/10/2025 वन्यजीव सप्ताह 1 ते 7 ऑक्टोबर या कालावधीत साजरा केला जातो.हा सप्ताह साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे भारतातील वनस्पती आणि प्राणी यांचे संरक्षण आणि संवर्धन करण्याबद्दल लोकांमध्ये,विशेषत: तरुण पिढीमध्ये जागरूकता निर्माण करणे हा आहे.



वन्यजीव सप्ताह दरम्यान देशभरात विविध उपक्रम आणि कार्यक्रमांचे आयोजन केले जाते,त्यापैकी येरकड उपक्षेत्रातील मौजा जपतलाई येथील संयुक्त वन व्यवस्थापन समिती जपतलाई समितीचे अध्यक्ष अनिल सलामी यांच्या उपस्थित येरकड उपक्षेत्र वनकर्मचारी मिळून जनजागृती आणि शिक्षण कार्यशाळा आणि चर्चासत्र: वन्यजीव संरक्षण,जैवविविधतेचे महत्त्व आणि मानव वन्यजीव स़घर्ष कमी कसे करता येईल -प्राणी संबंधांवर विविध माहीती देण्यात आले.


थोडक्यात, वन्यजीव सप्ताह हा लोकांना निसर्गाच्या समतोलात वन्यजीवांचे स्थान किती महत्त्वाचे आहे, हे समजावून सांगून त्यांच्या संवर्धनासाठी कृती करण्यास प्रवृत्त करण्याचा एक राष्ट्रीय स्तरावरील प्रयत्न आहे.


या निमित्ताने दक्षिण धानोरा वनपरिक्षेत्राअंतर्गत येरकड उपक्षेत्रातील येरकड बिटामध्ये लोकांना वन व वन्यजीव यांचं महत्व पटवून देण्यात आले यावेळी मार्गदर्शन करतांना वनपरिक्षेत्र अधिकारी मा. सुमित पुरमशेट्टीवार क्षेत्र सहाय्यक सुरेश डंकरवार वनरक्षक श्रीकांत सेलोटे वनरक्षक कु. वैशाली उईके प्रविण उसेडी व इतर वनकर्मचारी तसेच जपतलाई ग्रामस्थ उपस्थीत होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !