सेवाभावी संस्था प्रबोधन समितीच्या नागपूर विभागाची पत्रकार परिषद आणि कार्यशाळा यशस्वी.
एस.के.24 तास
वर्धा : ५ ऑक्टोबर २०२५ रोजी वर्ध्यात यशवंत महाविद्यालयात नागपूर, वर्धा,चंद्रपूर,गोंदिया, भंडारा, गडचिरोली या सहा जिल्ह्यांतील बरेचसेवाभावी संस्था व संस्थाचालक सहभागी झाले.या कार्यशाळेत मोडकळीस आलेल्या संस्थांचे पुनर्वसन, शासकीय योजना व निधी मिळवण्याचे मार्गदर्शन,CSR निधी आणि संस्थांमधील नेटवर्किंग या विषयांवर सखोल चर्चा झाली.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे यशवंत महाविद्यालयाचे अध्यक्ष समीर देशमुख, वरिष्ठ न्यायाधीश विवेक देशमुख, आणि वैद्यकीय जनजागृती मंचाचे अध्यक्ष डॉ. सचिन पावडे उपस्थित होते.तसेच, सेवाभावी संस्थेच्या राज्यअध्यक्ष डॉ.सुनिताताई मोडक यांनी नागपूर विभागाच्या कार्यकारिणीची घोषणा केली. राष्ट्रपती पदक विजेता रश्मी वाळके यांचा सहकार्याबद्दल सन्मान करण्यात आला.
पत्रकार विपुल पाटील, अमोल येसाणकर, अब्दुल कदीर, सचिन महाजन. सुमंत पाटील.यांसह अनेक पत्रकार उपस्थित राहून या कार्यक्रमाला महत्वाचे सूचनांचे व व्यक्तिमत्वांचे आधार मिळवून दिले.हा कार्यक्रम समाजसेवेच्या क्षेत्रात एक मोठा टप्पा आहे ज्याने अनेक संस्थांना नव्या दिशा दिल्या आहेत.