कोंबड्याच्या बेंध्यामध्ये अडकून असलेल्या अजगर सापाला पकडून सर्प मित्रांनी दिले जीवनदान.
एस.के.24 तास
चंद्रपूर : घुगुस सोनेगाव येथे गणेश ढाकणे यांच्या घरी कोंबड्याच्या बेंध्यामध्ये भयानक मोठा अजगर जातीचा साप आढळला. माहिती मिळताच गणेश ढाकणे यांच्या घरी आरडा ओरड सुरू झाले.पवन कौरसे यांनी सर्प मित्र.रंजीत मडावी यांना कॉल केले.
आणि लगेच सर्प मित्र विशाल मडावी, सर्प मित्र,रंजीत मडावी, सूरज कुमार, नवनीत मसराम, घटनास्थळ पोहचले..सोनेगाव येथे.. बेंध्यामध्ये फसलेल्या अजगर जातीचा सापाला सुरक्षित बाहेर काढून रेस्कु केले.आणि जंगल परिसरात सुरक्षित सोडण्यात देण्यात आले.